सत्य पडताळणी : इम्रान खान बोलले राज ठाकरेंचे बोल?

False

इम्रान खान बोलले राज ठाकरेंचे बोल अशा शीर्षकाने डेली महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाने एक वृत्त दिले आहे. या वृत्तात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानवर आणखी एक हवाई हल्ला होण्याची भिती व्यक्त केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्द होण्याची शक्यता असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानवर भारत हवाई हल्ला करेल का याबाबत काय वक्तव्य केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इंडिया टूडेने 9 मार्च रोजी याबाबत वक्तव्य केल्याचे एक वृत्त प्रसिध्द केले आहे. या वक्तव्यानुसार लोकसभा निवडणूकीपुर्वी पुलवामासारखा एखादा हल्ला होऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. या वृत्तात कुठेही भारत पाकिस्तानवर हवाई हल्ला करेल, असे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

द हिंदूनेही 9 मार्च 2019 रोजी एक वृत्तातही राज ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केल्याचे दिसून येत नाही. राज ठाकरे यांनी केवळ पुलवामासारखा आणखी एक हल्ला होऊ शकतो, असा इशारा दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.   

C:\Users\Fact1\Desktop\thehindu.com.jpg

आक्राईव्ह लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च 2019 रोजी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ युटूयूबवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओत 34 मिनिट 32 सेकंद ते 34 मिनिट 45 सेकंद दरम्यान त्यांनी पूलवामा सारखा हल्ला पून्हा घडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी पाकिस्तान हवाई हल्ला होण्याची शक्यता असलेले विधान संपूर्ण भाषणादरम्यान केलेले नाही.

पाकिस्तानी वर्तमानपत्र द डॉनने याबाबत आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या वृत्तातही हवाई हल्ल्याची भिती व्यक्त केलेली नाही.

C:\Users\Fact1\Downloads\dawn.jpg

आक्राईव्ह लिंक

रॉयटर / (आक्राईव्ह लिंक) या वृत्तसंस्थनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. अनेक पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी आणि जगभरातील माध्यमांनीही याबाबतचे वृत्त दिले आहे.

विविध वर्तमानपत्रांनी याबाबतचे वृत्त दिल्याचे गुगलद्वारे सर्च केल्यानंतर दिसून येत आहे.

फायन्याशल टाईम्स/ (आक्राईव्ह लिंक) संकेतस्थळाने याबाबतचे मुळ वृत्त दिलेले आहे.

निष्कर्ष

इम्रान खान आणि राज ठाकरे या दोघांनीही पाकिस्तानवर हवाई हल्ला होण्याची भिती व्यक्त केलेली नाही. इम्रान खान यांच्या म्हणण्यानुसार भारताशी पाकिस्तानचे लष्करी शत्रुत्व वाढू शकते. भारतात लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी युध्दज्वर निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. इम्रान खान यांनी फायन्याशल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुठेही हवाई हल्ला असा शब्दप्रयोग केलेला नाही.  पाकिस्तानमधून प्रसिध्द डॉन या दैनिकामध्येही असे कुठेही म्हटलेले नाही. राज ठाकरे यांनीही पुलवामासारखी आणखी एखादी घटना घडू शकते, असे म्हटले आहे. त्यांनीही पाकिस्तानवर हवाई हल्ला होऊ शकतो, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : इम्रान खान बोलले राज ठाकरेंचे बोल?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False