
काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकला एनआयएने ताब्यात घेतल्यावर त्याच्या पत्नीने लाहोरमध्ये पत्रकार परिषद घेतली. याबाबतच्या पत्रकार परिषदेच्या पोस्टसोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत यासिन मलिक हातात हात देऊन तासभर गप्पा करायचे असे म्हटले आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यासिन मलिकसोबत गप्पा मारायचे का? याचा शोध घेत असताना रेडिफ डॉट कॉमने याबाबत दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात मलिकने डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान असताना भेटल्याचे वृत्त नाकारले आहे.

त्यानंतर आम्हाला यासिन मलिक याने मनमोहन सिंग यांना शांतता प्रक्रियेसाठी दहशतवाद्यांशी संपर्क करायचा होता, असा दावा करणारे इंडिया टूडेचे वृत्त दिसून आले.

मनमोहन सिंग हे यासिन मलिक याची शुक्रवारी भेट घेणार असल्याचे 16 फेब्रुवारी 2006 रोजी रेडिफ डॉट कॉमने एक वृत्त दिल्याचे आम्हाला दिसून आले.

यासिन मलिकने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची का भेट घेतली होती आणि त्यातुन काय साध्य झाले. याबाबतचे एक पत्र यासिन मलिकने अमेरिकेला लिहिले असल्याचे वृत्त ग्रेटर काश्मीर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिले आहे. यातुन ही एक शांतता प्रक्रियेची चर्चा असल्याचे स्पष्ट होते.

यासिन मलिक याने मनमोहन सिंग याचा भेट घेतल्याचा एक व्हिडिओही आम्हाला दिसून आला.
निष्कर्ष
फुटिरतावादी नेता यासिन मलिक याने मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याचे यातून स्पष्ट होते. पोस्टमध्ये दावा करण्यात आल्याप्रमाणे हातात हात घेऊन ते गप्पा करत नव्हते तर काश्मीरच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी गंभीर स्वरुपाच्या चर्चेची ही प्रक्रिया होती. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आल्याचा ते गप्पा करत होते हा दावा असत्य ठरत आहे.

Title:तथ्य पडताळणी : पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यासिन मलिकसोबत गप्पा मारायचे?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
