
अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने नवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे’, असा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या योजनेसाठी महापालिकेत संपर्क साधण्यात सांगण्यात आल्याने आम्ही सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी आम्हाला अशा प्रकारची कोणतीही योजना असल्याचे दिसून आले नाही.

मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या फेसबुक पेजवर आम्हाला एक पोस्ट दिसून आली ज्यात म्हटले आहे की महापालिकेने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नाही.
आम्ही आमची पडताळणी आणखी पुढे नेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर याबाबत काही माहिती मिळते का, हे पाहिले. याठिकाणी अशी कोणतीही शिष्यवृत्ती योजना आम्हाला दिसून आली नाही.

महाराष्ट्र सरकारच्या विविध शिष्यवृत्तीची पडताळणी केली असतानाही आम्हाला या नावाची योजना दिसून आली नाही.

भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही आम्हाला याबाबत कोणतीही माहिती आढळून आली नाही.

निष्कर्ष
या पोस्टमध्ये दिल्याप्रमाणे अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणतीही योजना राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांकडून राबविण्यात येत नसल्याचे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोला ही पोस्ट असत्य असल्याचे दिसून आले आहे.

Title:अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयींच्या नावाने शिष्यवृत्ती योजनेची माहिती किती खरी?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
