
सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्या पोस्टमध्ये गुजरातला गिफ्ट ! अहमदाबादजवळ उभारणार नवी आर्थिक राजधानी असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडोकडून सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवरुन राज सरकार या पेजवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 388 शेअर, 232 लाईक्स आणि 19 कमेंटस् मिळाल्या आहेत.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असे म्हणण्यात येत आहे की, अहमदाबादजवळ एक नवीन आर्थिक राजधानी उभारण्यात येत आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडो टीमने गुगलवर अहमदाबादजवळ उभारणार नवीन आर्थिक राजधानी आणि गिफ्ट सिटी न्यूज असे सर्च केले.
या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी सोशल मीडियावर व्हायरल होणारी न्यूजचा फोटो हा दैनिक सामना मधील असून, ही बातमी 5 जानेवारी 2019 रोजी सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. (सामनाच्या ई पेपरमध्ये एवढे जुने अर्काईव्ह पेज सेव्ह नसल्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटो उपलब्ध झाला नाही.)
द टाईम्स ऑफ इंडिया । अर्काईव्ह
गुजरातमधील ‘गिफ्ट’ म्हणजे काय?
अहमदाबाद-गांधीनगरदरम्यान निर्माण करण्यात येणारे हे नवे शहर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स-टेक सिटी (गिफ्ट) या नावाने ओळखले जाणार आहे. जागतिक आर्थिक संघटनेने (डब्ल्युईएफ) याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. सिंगापूर, हाँगकाँग हे जगातील मोठे आर्थिक केंद्र आहेत. जगभरातील अनेक गुंतवणूकदारांची पसंती सिंगापूर, हाँगकाँगला असते. त्याच धर्तीवर गुजरातमध्ये उभारण्यात येणाऱ्या नवीन शहराचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या विषयावर एनडीटीव्ही प्रॉफिट या वेब पेजवर बातमी प्रसिद्ध झाली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर बातमी वाचू शकता.
एनडीटीव्ही प्रॉफिट । अर्काईव्ह
गुजरातमध्ये गिफ्ट सिटी हा प्रॉजेक्ट तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात या सिटीसंदर्भात विविध आर्थिक गुंतवणूकीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सेंज या कार्यालयाचे उद्घाटनही गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले असल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये गिफ्ट आहे अशी सोशल मिडियावर व्हायरल होणारी पोस्ट खरी असून, गुजरातमध्ये गिफ्ट नावाची सिटी (शहर) आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट गुजरातला गिफ्ट अहमदाबाद जवळ उभारणार नवी आर्थिक राजधानी या पोस्टमधील दावा गुजरातमध्ये गिफ्ट आहे का? हे तथ्य सत्य आहे.
