
बेळगाव येथे 19 वर्षीय गौरक्षणकाची हत्या अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
बेळगाव येथे 19 वर्षीय गौरक्षणकाची हत्या करण्यात आली आहे का? याचा शोध घेत असताना न्यूज 18 चे खालील वृत्त दिसून आले. यात 19 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येप्रकरणी खूनाची अफवा पसरविण्यात आल्याने दोघांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.

बेळगाव येथील 19 वर्षीय गौरक्षकाची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे, असे वृत्त thenewsminute.com या संकेतस्थळानेही दिले आहे.

बेळगाव लाईव्ह या संकेतस्थळानेही या घटनेबद्दलचे वृत्त दिले आहे. बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनीही सुरुवातीला या युवकाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनी हे ट्विटनंतर मागे घेतले. पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आणि अफवा न पसरविण्याचे ट्विट त्यांनी केले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
बेळगाव येथील 19 वर्षीय गौरक्षक युवकाची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे. बेळगाव पोलिसांनी स्वत: याचा खुलासा केला आहे. गौरक्षक युवकाची हत्या पसरविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे.

Title:तथ्य पडताळणी : बेळगाव येथे 19 वर्षीय गौरक्षकाची हत्या करण्यात आली आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
