सत्य पडताळणी : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास घटनेत बदल, पंकजा मुंडेंचे वक्तव्य?

Mixture राजकीय | Political

बाबासाहेब भीमराव अम्बेडकर ने संविधान लिखा. अगर बीजेपी दोबारा सत्ता में आई तो हम संविधान बदल देंगे असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वक्तव्याची तथ्य पडताळणी केली आहे. World of Dr.babasaheb ambedkar या पेजवर या पोस्ट 3 हजार 900 शेअर आहेत.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

पंकजा मुंडे यांनी नेमके काय वक्तव्य केले याचा शोध घेताना आम्हाला द हिंदूने दिलेले खालील वृत्त दिसून आले. पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या हे या वृत्तात दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या संकेतस्थळानेही यबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तातही पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या हे दिले आहे.

आक्राईव्ह लिंक

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या व्हेरिफाईड फेसबुक अकाऊंटवर गेलो. त्याठिकाणी आम्ही त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओचा शोध घेतला असता खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत 51 मिनिटे 44 सेकंद ते 52 मिनिटे 38 सेकंद या कालावधीत पंकजा मुंडेंचे वक्तव्य तुम्ही ऐकू शकता. यात त्यांनी घटनेत बदल करण्यासाठी असे म्हटलेले दिसून येते पण त्यांनी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलू असे म्हटलेले नाही.

याच भाषणातील काही अंश आम्ही खाली दिला आहे.

निष्कर्ष

पंकजा मुंडे यांनी घटना बदलाबद्दलचे वक्तव्य केले आहे पण भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू असे म्हटलेले नाही. तिथे जाऊन घटनेमध्ये काही बदल करायचा असेल काही बिले आणायची काही नियम करायचेत तर केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त अर्धसत्य आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास घटनेत बदल, पंकजा मुंडेंचे वक्तव्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture