
भाजप नेते एकनाथ खडसे यांचे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या छायाचित्रात खडसे यांनी ‘फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ’चा फलक हातात घेतलेला आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांचे हे छायाचित्र खरे आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
भाजप नेते एकनाथ खडसे यांचे हे छायाचित्र खरे आहे का? हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. त्यावेळी दैनिक पुढारीच्या संकेतस्थळावर 22 मे 2020 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. त्यात कोथंडी येथील एकनाथ खडसेंच्या घराच्या अंगणात त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाचे छायाचित्र कुणीतरी एडिट करुन चुकीच्या संदेशासह व्हायरल केल्याचे म्हटले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या स्नूषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या ट्विटर खात्यावर एकनाथ खडसे यांच्यासह त्यांनी केल्या महाराष्ट्र सरकारविरोधी आंदोलनाचे छायाचित्रही दिसून आले.
एकनाथ खडसे यांच्या मुळ छायाचित्राची आणि समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या छायाचित्राची खाली तुलना करण्यात आली आहे.

निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, ‘फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ’चा फलक हातात घेतलेले एकनाथ खडसे यांचे हे छायाचित्र बनावट आहे.

Title:भाजप नेते एकनाथ खडसे यांचे बनावट छायाचित्र व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
