Fact : नवलेवाडीत EVM मध्ये घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

False राजकीय | Political सामाजिक

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची माहिती देणारी Sagar Jadhav यांनी पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी  

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM मध्ये घोटाळा झाल्याची घटना घडली होती का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने 22 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेले खालील वृत्त दिसून आले. 

दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिनांक 22 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी दिल्याचे दिसून येते. निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं त्यांनीही मान्य केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. 

Archive

सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी येथे घडलेल्या या घटनेबद्दल विविध माध्यमांनी दिलेल्या या वृत्तानंतर निवडणुक आयोगाने 22 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचे दिसून येते. एबीपी माझा वृत्तवाहिनीचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण देणारे वृत्त आपण खाली पाहू शकता. 

Archive / Archive 2

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया आपण खाली पाहू शकता. 

निष्कर्ष 

सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी येथे EVM घोटाळा झाल्याचे वृत्त निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी फेटाळून लावले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : नवलेवाडीत EVM मध्ये घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False