काय खरचं पासपोर्ट कार्यालय गायब झाले? : सत्य पडताळणी

True सामाजिक

(सांकेतिक छायाचित्र: सौजन्य गुड रिटर्न)

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवी मुंबईचे खासदार राजन विचारे यांनी वाशी सेक्टर 16 येथे पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन केले. परंतू त्यानंतर ते पासपोर्ट कार्यालय गायब, असे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 1 हजार 900 व्ह्युज, 41 शेअर आणि 96 लाईक्स मिळाले आहेत.  

सत्य पडताळणी

फेसबुक

अर्काईव्ह

व्हायरल होणाऱ्या संपुर्ण पोस्टमधील व्हिडिओमध्ये पासपोर्ट कार्यालयाचा केवळ फलक आहे, परंतू पासपोर्ट कार्यालय नाहीये असे म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी नेमके कशाचे उद्घाटन केले आहे? पासपोर्ट कार्यालयाच्या फलकाचे की पासपोर्ट कार्यालयाचे? या पोस्टच्या खाली राजन विचारे यांच्या पाठपुराव्यातून नवी मुंबई, वाशी सेक्टर 16 पोस्ट कार्यालयात पासपोर्ट ऑफिस गायब आहे फक्त फलक असे लिहलेले आहे.

यासंदर्भात राजन विचारे यांच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या आहेत.

महाराष्ट्र टाईम्सअर्काईव्ह

डेलीहंटअर्काईव्ह

रामप्रहरअर्काईव्ह

या संदर्भात अधिक सत्य जाणून घेण्याच्या उद्देशाने गुगलवर वाशी सेक्टर 16 पासपोर्ट सेवा असे टाईप केल्यानंतर खालील रिझल्ट समोर आले आहेत.

वाशी पासपोर्ट कार्यालय या विषयावर वर दिलेल्या फोन नंबरवर फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून फोन केल्यानंतर या कार्यालयात पोस्ट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय पासपोर्ट विभागाकडून वाशी परिसरात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी जागेचा शोध सुरु होता. त्यानुसार आता वाशी सेक्टर 16 मधील पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या जागेची निवड झाली आहे. खासदार राजन विचारे यांच्या कडून येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होण्यासाठीची जागेची निवड झाली आहे, हे सर्वांना कळावे या उद्देशाने फलकाचे उद्घाटन झाले. परंतू पासपोर्ट कार्यालय प्रत्यक्षपणे सुरु होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. तसेच पासपोर्ट कार्यालय सुरु होण्यासाठीचे लॅन आणि इतर इफ्रास्ट्रक्चर बनविण्यासाठी, टेक्निकल गोष्टी पुर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कार्यालय सुरु होण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे, त्यामुळे पासपोर्ट कार्यालय 100 टक्के या ठिकाणी सुरु होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व तथ्यांचा विचार केल्यानंतर राजन विचारे यांच्या पाठपुराव्यातून नवी मुंबई वाशी सेक्टर 16 पोस्ट कार्यालयात पासपोर्ट ऑफिस गायब आहे असे नसून, पासपोर्ट कार्यालयाची जागा निश्चिती झाली आहे. तसेच काही काळानंतर पासपोर्ट कार्यालय सुरु होणार आहे.

निष्कर्ष :
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या नवी मुंबई वाशी सेक्टर 16 पोस्ट कार्यालयात पासपोर्ट ऑफिस गायब आहे हे वृत्त खरे आहे. कारण या पोस्ट ऑफिस कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाला मुख्य पासपोर्ट कार्यालयातून जागा निश्चिती झाली असून, कार्यालय सुरु होण्यासाठीची पुढील कार्यालयीन प्रक्रिया आणि इफ्रास्ट्रक्चरचे काम पुर्ण झाल्यानंतरच नियमितपणे पासपोर्ट कार्यालय सुरु होणार आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील वृत्त खरे आहे.

Avatar

Title:काय खरचं पासपोर्ट कार्यालय गायब झाले? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: True