‘सिरम’ने फेटाळला 73 दिवसात लस उपलब्ध करणार असल्याचा दावा; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध करणार असल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. सिरम इन्स्टिट्यूटची ही लस 73 दिवसात उपलब्ध होणार आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Covid-19.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोनाची लस 73 दिवसात उपलब्ध होणार आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी महाराष्ट्र टाईम्सने 23 ऑगस्ट 2020 रोजी बिझनेस टुडेच्या वृत्ताच्या आधारे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोनाची लस 73 दिवसात उपलब्ध होणार असल्याचे वृत्त दिल्याचे दिसून आले. 

MAHARASHTRA TIMES.png

महाराष्ट्र टाईम्स / संग्रहित

त्यानंतर बिझनेस टुडेच्या संकेतस्थळावर जाऊन याबाबतचे वृत्त पाहिले. त्यावेळी बिझनेस टुडेने 23 ऑगस्ट 2020 रोजी अशा स्वरूपाचे वृत्त दिल्याचे दिसून आले. परंतू या वृत्तात शेवटी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याबाबत दिलेले स्पष्टीकरण समाविष्ट केले असल्याचे दिसून आले. या स्पष्टीकरणात सिरमने कोविड-19 ची लस 73 दिवसात उपलब्ध करुन देणार असल्याचा माध्यमांचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. 

businesstoday.in.png

बिझनेस टुडे / संग्रहित

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याबाबत दिलेले स्पष्टीकरण आपण खाली पाहू शकता. 

Serum.png

फेसबुक पेज / संग्रहित

सिरमच्या ट्विटर खात्यावरही याबाबत देण्यात आलेले स्पष्टीकरण आपण पाहू शकता.

संग्रहित

निष्कर्ष 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 73 दिवसात कोरोनाची लस उपलब्ध करणार असल्याचा दावा असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

Avatar

Title:‘सिरम’ने फेटाळला 73 दिवसात लस उपलब्ध करणार असल्याचा दावा; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False