Fact Check : छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार?

False राजकीय | Political

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची घरवापसी होणार; शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची पोस्ट Sakaal ने आपल्या पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive  
तथ्य पडताळणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार आहेत का? याचा आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला इंडिया टूडेचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात छगन भुजबळ हे शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. 

इंडिया टुडे / Archive

या वृत्तानंतर स्वत: छगन भुजबळ यांनी या माहितीत काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती आपण खाली पाहू शकता. 

एएनआय या वृत्तसंस्थेला छगन भुजबळ यांनी स्वत: आपण कुठेही जाणार नसून जेथे आहोत तेथेच राहणार असल्याचे सांगितले. मी शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त तथ्यहीन आणि असत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एनएनआय वृत्तसंस्थेची बातमी / Archive 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी याबाबत भुजबळ यांनी स्वत:च प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगितले.  

निष्कर्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची घरवापसी होणार; शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त स्वत: छगन भुजबळ यांनी फेटाळून लावले आहे. प्रसारमाध्यमांना आणि एएनआय या वृत्तसंस्थेलाही त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False