दिल्लीतील लुटमारीच्या घटना महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Coronavirus False सामाजिक

देशभरात सध्या स्थलांतरित मजूरांचा प्रश्न चर्चेत आहे. या स्थलांतरित मजुरांकडे आता काम नसल्याने लुटमारीच्या घटना आणि गुन्हे वाढण्याची चिंताही आता काही जण व्यक्त करत आहेत. अशाच काही युवकांकडून एकटी व्यक्ती बघून निर्मनुष्य ठिकाणी लुटमार केली जात असल्याचे दोन व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. ही घटना मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चजवळ, महाराष्ट्रात घडल्याचे काही जण सांगत आहेत. तर काही जण ही घटना कुठे घडली याबद्दल प्रश्न विचार आहेत? फॅक्ट क्रेसेंडोने ही घटना कुठे घडली याची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक / अक्राईव्ह / फेसबुक/ अक्राईव्ह 

व्हॉट्सअपवरही हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची विचारणा फॅक्ट क्रेसेंडोकडे करण्यात आली.

Bandra Fact Check.png

तथ्य पडताळणी

लुटमारीच्या घटनेचे हे व्हिडिओ नेमके कुठले आहेत हे शोधण्यासाठी हे व्हिडिओ नीट पाहिले.

पहिला व्हिडिओ 

यातील पहिल्या व्हिडिओवर 28 एप्रिल 2020 अशी तारीख तसेच मजनू का टिला असे लिहिले असल्याचे दिसून आले.

Majnu ka tila.png

त्यानंतर शोध घेतल्यावर दिल्लीतील नवभारत टाईम्स या वृत्तपत्राच्या ट्विटर खात्यावरुन 30 एप्रिल 2020 रोजी करण्यात आलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटरमध्ये दिल्लीतील मजनू का टिला या भागात एका व्यक्तीचा गळा दाबून तिला लुटण्यात आल्याचे म्हटले आहे. लूटमार केल्यानंतर या व्यक्तीला बेशुध्द अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले.

अक्राईव्ह

त्यानंतर या घटनेतील आरोपींना पोलिसांनी शोधून काढले असल्याचे टविट या  वृत्तपत्र समुहातील पत्रकार रवी द्वेदी यांनी केल्याचेही आपण खाली पाहू शकता.

अक्राईव्ह

दुसरा व्हिडिओ

Delhi Baljeet nager.png

त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत 14 एप्रिल 2020 अशी तारीख दिसून आली. त्यात बलजित नगर नगर असे लिहिले असल्याचे दिसून आले. शोध घेतल्यावर दिल्लीतील बलजित नगर येथे 14 एप्रिल 2020 रोजी अशी एक घटना घडल्याचे आणि याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त 18 एप्रिल 2020 रोजी इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिल्याचे दिसून आले. या वृत्तात या घटनेचे हेच सीसीटीव्ही फुटेजही दाखवले आहे. कॅच न्यूज, हेडलाईन्स टूडेनीही हे वृत्त दिले आहे.

india Tv.png

इंडिया टीव्ही / अक्राईव्ह

यातून हे स्पष्ट झाले की, हे दोन्ही व्हिडिओ व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा असत्य आहे.

निष्कर्ष

लुटमारीचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा असत्य आहे. तो दिल्लीतला आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:दिल्लीतील लुटमारीच्या घटना महाराष्ट्रातील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False