उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर टीका करतानाचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ; सध्याचा म्हणून व्हायरल

Missing Context राजकीय | Political

उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे सदस्य पक्ष काँग्रेसला घरचा आहेर देत राहुल गांधीवर टीका केली, या दाव्यासह त्यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2019 सालचा आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या विरोधात होते.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधींसारख्या माणसाला जोडे मारले पाहिजे, असे उघडपणे बोलणारा मी एकमेव होतो. – उद्धव ठाकरे.” (भाषांतर)

मूळ पोस्ट – फेसबुक | ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली होती. 

रिपब्लिक न्यूज चॅनलने 18 सप्टेंबर 2019 रोजी युट्यूबवर व्हायरल व्हिडिओमधील उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यची क्लिप शेअर केली होती. 

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली.” व्हिडिओमधील महितीनुसार विक्रम संपत लिखित ‘सावरकर : भूतकाळातील प्रतिध्वनी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाषण करत असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधींवर टीका केली होती.

अधिक सर्च केल्यावर ‘सावरकर स्मारक’ या युट्यूब चॅनलवर या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ आढळला.

या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी 11:21 ते 12:05 मिनिटावर स्वातंत्र्यसैनिक सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधींवर टीका केली होती.

अर्थात उद्धव ठाकरेंनी ही टीका इंडिया आधाडीत सामिल होण्यापुर्वी म्हणजे चार वर्षाआधी केली होती.

गेल्या वर्षीची घटना

इंडिया आघाडीची स्थापना 17 जुलै 2023 रोजी झाली होती. तत्पूर्वी मार्च 2023 मध्ये राहुल गांधी एका पत्रकार परिषदेत बोलतांना वादग्रस्त विधान केले की, “माझ नाव सावरकर नसून गांधी आहे आणि मी माफी मागणार नाही.” हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यवर टीका करत म्हटले की, “सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि आम्ही त्यांचा अपमान स्वीकारणार नाही.” हे वक्तव्य येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होती की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे. राहुल गांधींनी 2019 मध्ये स्वातंत्र्यसैनिक सावरकरांवर वादग्रस्त विधान केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात हे वक्तव्य केले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींवर टीका करतानाचा चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ; सध्याचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Missing Context