सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवले का? वाचा सत्य

False राजकीय | Political सामाजिक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरंच अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी सीबीआयला पत्र पाठवलंय का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

screenshot-www.facebook.com-2020.07.18-19_33_45.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवले का? याचा शोध घेतला. त्यावेळी दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर 15 जुलै 2020 रोजी प्रसिध्द झालेले वृत्त दिसून आले. सुशांतच्या मृत्यूची गृहमंत्री अमित शाहांनी घेतली दखल, असे शीर्षक असलेल्या या वृत्तात माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पू यादव यांनी एक पत्र लिहून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी केली होती, असे म्हटले आहे. त्यांच्या या मागणीपत्राला उत्तर देताना गृहमंत्रालयाने पत्र लिहून पप्पू यादव यांना ‘तुमचं पत्र १६ जून २०२० रोजी मिळाले. या पत्रातून तरुण सिनेअभिनेता स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. तुमच्या पत्राचा विषय वस्तू कार्मिक व प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे आवश्यक कारवाई हेतु संबंधित मंत्रालयाकडे हे पाठवण्यात येत आहे’ असे कळविल्याचे म्हटले आहे. यातून हे स्पष्ट झाले की गृहमंत्रालयाने या पत्राची दखल घेत ते अन्य विभागाकडे पाठवले आहे. 

screenshot-archive.is-2020.07.18-20_59_52.png

महाराष्ट्र टाईम्सचे वृत्त / संग्रहित

त्यानंतर माजी खासदार पप्पू यादव यांनी केलेले ट्विटही आम्ही पाहिले. या ट्विटमध्ये त्यांनी हे पत्र प्रसिध्द केले असून अमित शाह या घटनेचा सीबीआयद्वारे तपास करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

गृहमंत्री अमित शाह यांनी हे पत्र  वस्तू कार्मिक व प्रशिक्षण विभागाला पाठविला असल्याचे म्हटले आहे. विकीपीडियावर असलेल्या माहितीनुसार सीबीआय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या नऊ विभागांपैकी एक आहे.

image1.png

विकीपीडियावरील माहिती / संग्रहित

यातून हे स्पष्ट होते की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. त्यांनी माजी खासदार पप्पू यादव यांचे पत्र केवळ पुढील कार्यवाहीसाठी वस्तू कार्मिक व प्रशिक्षण विभागाला पाठविले आहे.

निष्कर्ष

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याचे असत्य आहे.

Avatar

Title:सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवले का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False