दिल्लीतील यूथ काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडिओ गुजरातमधील मोदीविरोधी आंदोलन म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडत एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक आंदोलन करताना दिसतात आणि ते गुजरातमध्ये पीएम निवासस्थानाकडे कूच करत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, आंदोलनकर्ते मोदींना सत्तेतून हटवण्याच्या घोषणा देताना दिसतात.

या व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात मोठे आंदोलन झाले.

फॅक्ट चेक

रिव्हर्स इमेज सर्चमध्ये ‘लोकतंत्र टीवी’च्या यूट्यूब चॅनेलवर 10 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

त्या व्हिडिओमध्ये सुमारे 1:03 मिनिटांच्या टप्प्यावर व्हायरल क्लिपसारखीच दृश्ये दिसतात. यावरून स्पष्ट होते की हा व्हिडिओ गुजरातमधील नसून दिल्लीतील आहे.

पुढील तपासात ‘देव चौधरी’ नावाच्या फेसबुक युजरच्या अकाउंटवरही हा व्हिडिओ 10 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेला आढळला. या पोस्टमध्ये #EpsteinFiles असा हॅशटॅग वापरत, हजारो काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान निवासस्थानाचा घेराव करण्यासाठी निघाल्याचे नमूद केले आहे.

या संदर्भात आम्ही संबंधित युजरशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की हा व्हिडिओ गुजरातमधील नसून दिल्लीमध्ये यूथ काँग्रेसने ‘Epstein Files’ प्रकरणावर केलेल्या आंदोलनाचा आहे.

https://www.facebook.com/reel/948210921205655

आणखी शोध घेतल्यावर आम्हाला 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित झालेली एक बातमी मिळाली. या बातमीत दिल्लीत जंतर-मंतर येथे यूथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केल्याचे नमूद आहे.

या सर्व पुराव्यांवरून स्पष्ट होते की दिल्लीतील आंदोलनाचा व्हिडिओ गुजरातचा असल्याचा चुकीचा दावा करून सोशल मीडियावर पसरवला जात आहे.

निष्कर्ष

तपासातून हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील नसून 10 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीमध्ये यूथ काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा आहे. त्यामुळे व्हिडिओसोबत केला जाणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Result Stamp

Title: दिल्लीतील यूथ काँग्रेसच्या आंदोलनाचा व्हिडिओ गुजरातमधील मोदीविरोधी आंदोलन म्हणून व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False