इराण आणि इस्रायलमधील संघर्ष म्हणून व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल

False Social

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका हवाई हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हा व्हिडिओ इस्राएली विमानांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचा आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून एका गेमची क्लिप आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही विमान हवाई हल्ला करताना दिसतात. 

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “२ इस्राएली विमाने इराण मध्ये अक्षरशः तांडव करत आहेत , आणि चिनी एअर डिफेन्स सिस्टम फक्त हवेत गोळीबार.”

https://archive.org/details/fb-post-200625

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ इराण – इस्रायल संघर्षाशी संबंधित नाही.

बॅटल ड्रॅगन नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 30 डिसेंबर 2024 रोजी शेअर केला होता. 

व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा व्हिडिओ गेममधील युद्धाची भीषणता दाखवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हे दृष्य आर्मा 3 आणि आर्मा रिफोर्जर या गेम्समधून घेण्यात आलेले आहेत.”

मूळ पोस्ट – युट्यूब

सध्याचे इस्रायल-इराणमध्ये संघर्ष

इराणने 19 जून रोजी श्रेपणास्त्राचा वापर करत इस्रायलमधील अझोर शहरातील एका घरावर हल्ला केला. या हल्ल्यात मालमत्तेचे नुकसान झाले असून कोणतीही जिवितहनी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केल्याचा नाही. मुळात हा व्हिडिओ आर्मा 3 आणि आर्मा रिफोर्जर नामक गेम मधून घेण्यात आला आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इराण आणि इस्रायलमधील संघर्ष म्हणून व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *