गुजरात विमान दुर्घटनेचा व्हिडिओ म्हणून असंबंधित जुनी क्लिप व्हायरल; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

गुजरात विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “ गुजरात विमान दुर्घटनेचे दृष्य प्रवाशाच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरात विमान दुर्घटनेचा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विमानातून उड्डाण करताना मोबाईलमध्ये शुट करत होते . त्यानंतर अचानक विमान कोसळते आणि जाळ दिसतो.

व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “विमानातील प्रवाशाच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली दुर्घटना, विमानतळावरुन विमान टेकऑफ करताना प्रवाशानं केलं फेसबुक लाईव्ह, फेसबुक लाईव्ह चालु असतानाच कोसळलं विमान, गुजरात विमान दुर्घटनेत मोठी जीवितहानी.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “GUJARAT PLANE CRASH : विमानातील प्रवाशाच्या फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाली दुर्घटना.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरात विमान दुर्घटनेचा नाही.

फॉक्स 26 ह्युस्टन नामक युट्यूब न्यूज चॅनलने हाच व्हिडिओ 16 जानेवारी 2023 रोजी शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 68 जणांचा मृत्यू होण्यापूर्वीचे शेवटचे क्षण फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत.”

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह

सदरील माहितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, नेपाळमधील पोखराला जाणाऱ्या ATR‑72 विमानात 15 जानेवारी 2023 रोजी अपघात झाला; विमानमधील 72 प्रवाशांपैकी सगळे प्रवासी आणि कर्मचाऱे ठार झाले. या दुर्घटनेपूर्वी प्रवासी ‘सोनू जायसवाला’ने विमानात फेसबुक लाईव्ह करुन अपघाताचे अंतिम क्षण रेकॉर्ड केले होते. अधिक माहिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

गुजरात विमान दुर्घटना

गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गुजरात विमान दुर्घटनेशी संबंधित नाही. हा 2023 मधील नेपाळ विमान दुर्घटनेचा व्हिडिओ आहे. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरात विमान दुर्घटनेचा व्हिडिओ म्हणून असंबंधित जुनी क्लिप व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *