काँग्रेसच्या बैठकीत ‘चोर ग्रुप मिटिंग’ असे लिहिलेले नव्हते; तसा बनावट फोटो व्हायरल

False राजकीय | Political

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. बैठकीच्या बॅनरवर कोर (Core) या शब्दाची स्पेलिंग चोर (Chor) अशी लिहिण्यात आली होती, असा दावा या फोटोच्या माध्यमातून केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो बनावट आहे.

काय आहे दावा?

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांसारख्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचा फोटो व्हायरल पोस्टमध्ये शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये बॅनरवर “Chor Group Meeting” असे लिहिलेले दिसते.

सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “कोअर ( Core ) चे स्पेल्लिंग चुकल्याने – Chor (चोर ) ग्रुप मीटिंग झाले पण एकाही विद्वानांना ही घोडचूक दिसली नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्याद्वारे कळाले की, हा फोटो 2019 काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील आहे.

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत यूट्युब चॅनेलवर या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ उपलब्ध आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसतर्फे 25 मे 2019 रोजी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, बॅनरवर Chor Group Meeting लिहिलेले नाही.

राज्यसभा टीव्हीच्या वेबसाईटवरील बातमीनुसार, 2019 साली लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारणी समितीने बैठक बोलावली होती. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी बैठकीमध्ये काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु, समितीने त्यांचा राजीनामा नाकारला होता.

व्हायरल होत असलेला फोटो पीटीआय वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार कमल किशोर यांनी काढला होता. मूळ फोटो आणि व्हायरल फोटो यांची तुलना केल्यावर लगेच कळते की, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेतील फोटोला खोडसाळपणे एडिट करून शेअर करण्यात येत आहे. मूळ फोटोत Chor Group Meeting असे लिहिलेले नव्हते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:काँग्रेसच्या बैठकीत ‘चोर ग्रुप मिटिंग’ असे लिहिलेले नव्हते; तसा बनावट फोटो व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False