भारताकडून पाकिस्तानच्या २०० पेक्षा जास्त वेब साईट हॅक करण्यात आल्या आहेत अशी पोस्ट सोशल मिडियावर वायरल होत आहे. यामध्ये पाकमधील काही सरकारी वेबसाईट यांचा समावेश आहे असे वृत्त पसरत आहे.

अर्काइव्ह

सत्य पडताळणी

भारतीय हॅकर असणारा एक ग्रुप टीम आय क्रू यांच्या कडून पाकिस्तानच्या विविध वेब साईट हॅक करण्यात आल्या आहेत.

सौजन्य : Times now news

हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर हॅकर्सने पोस्ट केले आहेत. याबद्दल विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या आहेत.

सौजन्य : प्रजावाणी

खाली दिलेल्या वृत्तपत्रांमध्ये आपण सविस्तर वृत्त वाचू शकतात.
Times now news l अर्काइव्ह l
प्रजावाणी l अर्काइव्ह l

काही वृत्तपत्रांनी तर हॅक करण्यात आलेल्या वेबसाईटचे अड्रेस पण दिलेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तान सरकारची महत्वाची मानली जाणारी www.pakistanarmy.gov.pk ही वेबसाईट असल्याचा उल्लेख देखील आहे. पाकिस्तानसाठी सायबर हलल्यातील आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे याबद्दल म्हंटले जात आहे.

तसेच पाकिस्तान मधील वृत्तपत्र डॉन मध्ये सायबर हॅकिंग बद्दल वृत्त प्रसारित झाले आहे. त्या वृत्तानुसार पाकिस्तान शेजारील काही राष्ट्रांना काही साईट वापरतांना त्रास झाला आहे.

सौजन्य : News 18

सविस्तर वृत्त आपण येथे वाचू शकतात.
News 18 l अर्काइव्ह

Dawn l अर्काइव्ह
सौजन्य : डॉन

ही आहे पाकिस्तानमधील हॅक करण्यात आलेल्या वेबसाईटची लिस्ट ...

सौजन्य : लोकसत्ता
लोकसत्ता l अर्काइव्ह l

निष्कर्ष :  पुलवामा हल्ल्याचा उत्तरार्ध भारताकडून पाकिस्तानवर केलेडीजीटल सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य अभ्यासले असता, भारताकडूनची ही कृती सत्य आहे. त्यामुळे हे वृत्त सत्य आहे.

MisleadingTitle: पाकवर भारताने केले डीजीटल सर्जिकल स्ट्राईक : सत्य पडताळणी
Fact Check By: Amruta Kale
Result: True