सोशल मीडियावर भाजप खासदार व अभिनेता सनी देओलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सनी देओल लडखडत रस्त्यावर चालताना दिसतात.

या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर फिरत होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. व्हिडिओमधील प्रसंग एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा आहे.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये सनी देओल लडखडत रस्त्यावर चालतात आणि एक रिक्षाचालक त्यांना आपल्या रिक्षात बसवतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भाजपच्या अशा नेत्यांकडून जनतेने काय अपेक्षा कराव्यात ?” “दारुच्या नशेत भाजप खासदार सन्नी देओल.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील दृष्य सफर नामक चित्रपटाच्या निर्मिती दरम्यानचे आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी सनी देओल चित्रपटाची शुटिंग करत होते.

मूळ पोस्ट – द इकनॉमिक टाइम्स

सनी देओल यांनी व्हायरल दाव्याचे खंडन करत आपल्या अधिकृत ट्विटवरून हे दृष्य शुटिंगदरम्याचे असल्याचे स्पष्ट केले. ते कॅप्शनमध्ये लिहितात की, “अफवांचा ‘सफर’(प्रवास) इथपर्यंतच.”

https://twitter.com/iamsunnydeol/status/1732317795382337834?s=20

तसेच ‘सफर’या चित्रपटाचे निर्माते विश्वास राणा यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शुटिंगदरम्याचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहितात की, “व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘सफर’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्याचा आहे. ज्यामध्ये अभिनेते सनी देओल रात्रीच्या वेळी शुटिंग करत होते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ सोबत खोट्या बातम्या व्हायरल होत आहे. सर्व चाहत्यांना विनंती आहे की, अशा व्हिडिओ विश्वास ठेऊ नका.”

https://www.instagram.com/reel/C0gVruAPJeS/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

सनी देओल यांनी 2019 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती.

गदर 2 चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पत्रकांरानी आपण पुन्हा निवडणूक लढवणार का ? असा सवाल केल्यावर “मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही आणि तसेही लोकांनी माझी निवड कलाकर म्हणून केली आहे.” असे उत्तर सनी देओलने दिले. संपुर्ण बातमी येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. मूळ व्हिडिओमध्ये सनी देओल ‘सफर’ या आगामी चित्रपटाची शुटिंग करत होते. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सनी देओल दारुच्या नशेत रस्त्यावर फिरत नव्हते; चित्रपटाच्या शुटींगचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading