फेसबुकच्या पोस्टमध्ये @Highlight असे कमेंट कल्यावर अकाउंट हॅक झाले आहे का नाही हे कळते का? वाचा सत्य
फेसबुक कमेंटमध्ये प्रथम @highlight लिहिल्यास तो मजकूर निळा दिसला, तर समजावे की, आयडी सुरक्षित आहे आणि कोणीही सहज हॅक करू शकत नाही, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे. फेसबुकच्या पोस्टमध्ये @Highlight असे कमेंट कल्यावर अकाउंट हॅक झाले आहे का नाही हे कळते नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, “फेसबुकचे नवीन आश्चर्य, तुम्ही कमेंटमध्ये प्रथम @highlight लिहिल्यास आणि हायलाइट मजकूर निळा दिसला, तर तुम्हाला समजले पाहिजे की तुमचा आयडी मजबूत आहे आणि कोणीही तो सहज हॅक करू शकत नाही.”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, काही महिन्यांपूर्वी अशीच एक पोस्ट व्हायरल झाली होती की,
फेसबुक पोस्टच्या कमेंटमध्ये "@" चिन्ह टाइप केल्यानंतर "हायलाइट" शब्दावर क्लिक केल्याने तुमचे प्रोफाइल सर्वात जास्त पाहणारे युजर्स तुम्हाली दिसती.
मूळ पोस्ट – फेसबुक
@highlight काय करते?
सर्वप्रथम व्हायरल पोस्टच्या कमेंटमध्ये @highlight टाइप केल्यावर त्याखाली "काही मित्रांना ते नोटिफिकेशन पाठवेल." अर्थात मित्र सूचीतील काही वापरकर्त्यांना ही पोस्ट पाहण्यासाठी सूचना मिळू शकतात हे सांगण्याचा हा एक मार्ग आहे.
तसेच व्यक्तीच्या नावापुढे ‘@’ टाइप केल्यास त्या व्यक्तीला पोस्टमधील कमेंट विभागात सूचित केले जाईल.
काही युजर्स जास्त कमेंट व लाईकसाठी अशा प्रकारचे पोस्ट करत असतात.
फेसबुकमध्ये अशी काही तरतूद आहे का?
फेसबुक वापरकर्त्यांना त्यांची प्रोफाईल कोणी पाहिले याची महिती याची माहिती देत नाही. तसेच थर्ड पार्टी ॲप्सना देखील ही परवाणगी देऊ शकत नाही. तसेच जर कोणत्याही ॲप्स किंवा वेबसाइट्सने अशा प्रकारची माहिती प्रदान करण्याचा दावा केला तर युजर्स त्या विरोधात फेसबुक कडे तक्रार करू शकतात.
याबद्दल अधिक मिळविण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने मेटाशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले. “फेसबुक युजर्सना असे कोणते ही, विशेष अधिकार देत नाही की, ज्याने आपल्या प्रोफाइलला भेट देणारे युजर्सचे अकाउंट आपल्याला पाहता येतील.”
इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार हा एक स्कॅम असून पोस्टच्या कमेंटमध्ये @highlight लिहून वापरकर्त्यांना त्यांचे ‘स्टॉकर्स’ ओळखता येतील.
खाते सुरक्षेची खात्री कशी करावी?
- तुमचा फेसबुक पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका.
- तुमची लॉगिन माहिती कधीही शेअर करू नका.
- तुम्ही जर एकच संगणकावर एक पैक्षा अधिक फेसबुक अकांउट लॉगइन असेल तर लॉग आउट करा.
- अनोळखी अकाउंटवरून अलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
- संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नका, जरी ते लिंक तुमच्या मित्राकडून किंवा कंपनीकडून शेअर करण्यात आली असेत तरी सुद्धा क्लिक करू नका. अधिक महिती येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरून सुद्ध होते की, व्हायरल मेसेच भ्रामक आहे. फेसबुकच्या पोस्टमध्ये ‘@’ किंवा ‘Highlight’ असे कमेंट कल्यावर अकाउंट हॅक झाले आहे का नाही हे कळते नाही, याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाहीत. भ्रामक दाव्यासह मेसेज व्हायरल होता आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:फेसबुकच्या पोस्टमध्ये @Highlight असे कमेंट कल्यावर अकाउंट झाले आहे का नाही हे कळते का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar Rawate
Result: Misleading