श्रीलंका सरकारने अशोक वाटिकेची शिला राम मंदिराला भेट दिली का? वाचा सत्य
आयोध्येत सध्या राम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्रीलंका एअरलाइन्समधून काही भिक्खू हातात एक वस्तू घेऊन उतरतात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतात.
दावा केला जात आहे की, माता सीता अशोक वाटिकेत असताना ज्या दगडावर बसायच्या, आता हा दगड आयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात बसवला जाईल.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणी अंती कळते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली वस्तू अशोक वाटिकेतील शीला नाही. हे भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष असून प्रदर्शनासाठी कुशीनगरमध्ये आणले गेले होते.
काय आहे दावा ?
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “माता सीताजी लंकेतील अशोक वाटिकेत ज्या दगडावर बसत होत्या तो दगड श्रीलंका सरकारने विमानाने भारतात पाठवला. अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारल्या जाणाऱ्या नव्या राम मंदिरात हा दगड बसवला जाणार आहे. हा दगड जमा करण्यासाठी योगी आदित्यनाथ स्वतः विमानतळावर पोहोचले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओमधील विमान आणि भिक्खुंचे फोटो भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 20 ऑक्टोबर 2021 रोजी ट्विट केल्याचे आढळले.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू आणि सरकारी शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि सहकारी मंत्र्यांनी स्वागत केले.”
तसेच भाजप नेता किरेन रिजिजू ट्विट करत सांगतात की, “अश्विन पौर्णिमा आणि अभिधम्म दिनानिमित्त श्रीलंकेतील पवित्र बुद्ध अवशेषाचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आगमन झाल्यानंतर त्याचे औपचारिक स्वागत करण्यात आले.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. “कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे. माझा आनंद आज द्विगुणीत झाला आहे. पूर्वांचलच्या लोकांप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याचा हा क्षण आ आहे. तसेच कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणी म्हणून राहणार नाहीतर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल. असे नरेद्र मोदी म्हणाले. अधिक माहिती आपण येथे वाचू शकातात.
राम मंदिर
अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर उदघाटनाचा सोहळा पार पडणार आहे. सर्वांनाच अयोध्येत जाणे शक्य नाही, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांनी संपूर्ण देशात आयोध्येचे वातावरण तयार करण्याची योजना आखली आहे. अधिक माहिती येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली वस्तू अशोक वाटिकेतील शिला नाही. या ठिकाणी 2021 मध्ये भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणले होते. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.hocal_container_hocal {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.hocal_container_hocal::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.hocal_container_hocal img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.hocal_container_hocal span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.hocal_container_hocal {
text-align: center;
}
.hocal_container_hocal img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:श्रीलंका सरकारने अशोक वाटिकेची शिला राम मंदिराला भेट दिली का? वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: False