ओमानमधील चक्रवादळाचा व्हिडियो मुंबईतील म्हणून होत आहे व्हायरल. पाहा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या असून त्या समुद्र किनाऱ्यावर धडका मारत असल्याचा एक व्हिडिओ संजय शर्मा यांनी पोस्ट केला आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी 

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळामुळे मुंबई किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार असल्याने हा व्हिडिओ मुंबईतील मरिन ड्राईव्हचा असल्याची शक्यता वाटली. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. त्यावेळी आम्हाला एका ठिकाणी al Bahri Ro असे लिहिले असल्याचे दिसून आले. सोबतच अरेबिक भाषेतील मजकूरसुद्धा लिहिलेला आहे.

image2.png

मुंबईतील फलकांवर आणि पाट्यांवर इंग्रजीप्रमाणेच मराठी भाषेचा वापर केलेला असतो. या ठिकाणी मराठी भाषा नसल्याने हा व्हिडिओ नक्की मुंबईतील आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेत मुंबईत असा कोणता मार्ग आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी असा मार्ग मस्कत, ओमान येथे असल्याचे दिसून आले. 

image4.png

त्यानंतर आम्ही ओमानला खरोखरच अशा चक्रीवादळाचा फटका बसला आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खलिज टाईम्स या आखाती देशातून प्रसिध्द होणाऱ्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाचे वृत्त दिसून आले. क्यार वादळाच्या प्रभावामुळे मस्कत आणि ओमानच्या किनाऱ्यावर मोठ्या समुद्री लाटा उसळत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यासोबतच या वृत्तात याचे काही व्हिडिओ देखील देण्यात आले आहेत.

image1.png

खलिज टाईम्स / Archive

अली शाह नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने या समुद्री लाटांचा एक व्हिडिओ ट्विट केला असून तो आपण खाली पाहू शकता. 

या संशोधनातून हे सिद्ध होत आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील नसून ओमान येथील आहे.

निष्कर्ष 

ओमानमधील क्यार चक्रीवादळामुळे उसळणाऱ्या लाटांचा व्हिडियो मुंबईतील असल्याचा म्हणून पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे सत्य दिसून आले. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:ओमानमधील चक्रवादळाचा व्हिडियो मुंबईतील म्हणून होत आहे व्हायरल. पाहा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False