
कोरोना व्हायरसचा (COVID-19) प्रादूर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक देशांमध्येसुद्धा या विषाणुची लागण झालेली आहे. कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत.
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर सध्या एक व्हिडियो प्रचंड फिरत आहे. यामध्ये कोंबडयांना जमिनीत जिवंत पुरण्यात येत असल्याचे दिसते. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये कोंबड्यांना असे मारण्यात येत असल्याचा व्हिडियोसोबत दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता तो खोटा आढळला.
तथ्य पडताळणी
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
इंटरनेटवर की-वर्ड्सद्वारे सर्च केल्यावर ट्विटरवर काही युजर्सने हा व्हिडियो शेयर केल्याचे आढळले. परंतु, या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची (H5N1) लागण झाल्यामुळे त्यांना मारण्यात येत असल्याचे या युजर्सने म्हटलेले आहे. चीनमधील हुनान प्रांतामध्ये बर्ड प्लूची साथ पसरली असली असून त्यामुळे हजारो कोंबड्यांना मारण्यात येत असल्याचे यात लिहिलेले आहे.
याविषयी अधिक शोध घेतल्यावर द डेली स्टार वेबसाईटवर हा व्हिडियो आढळला. यामध्ये म्हटलेय की, चीनमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे. तेथील हुनान प्रांतामध्ये या रोगाची साथ पसरल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. चीन आधीच कोरोना व्हायरसशी लढा देत असताना बर्ड फ्लूचे नवे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर आहे.

मूळ बातमी येथे वाचा – द डेली स्टार । अर्काइव्ह
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या एक फेब्रुवारीच्या बातमीनुसार, हुनान प्रांतामधील शायोयांग शहरातील एका पोल्ट्री फार्मवर बर्ड फ्लूची लागण झाल्याची चीनच्या कृषी व ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने दिली. फार्ममधील 7850 कोंबड्यांपैकी 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच बर्ड फ्लूमुळे एकुण 17 हजार 828 प्रांण्याना ठार करण्यात आले.

मूळ वृत्त येथे वाचा – रॉयटर्स । अर्काइव्ह । द जपान टाईम्स
चीनमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरल्यासंबंधी द प्रिंटचा रिपोर्ट तुम्ही खाली पाहू शकता. कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लू अशा दुहेरी संकटांचा सामना सध्या चीन सरकार व लोकांना करावा लागत आहे.
निष्कर्ष
कोंबड्यांना जिवंत जमिनीत पुरतानाचा हा व्हिडियो कोरना व्हायरसशी संबंधित नाही. चीनमध्ये सध्या बर्ड फ्लूची (H5N1) साथ पसरलेली असून त्यामुळे हुनान प्रांतामध्ये कोंबड्यांना असे मारले जात आहे.
तुमच्याकडेदेखील असे काही शंकास्पद व्हिडियो असतील तर ते फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवा.

Title:चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे नाही तर बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांना मारण्यात येत आहे. पाहा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
