
वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे उभे असणारे उमेदवार अजय राय यांच्याविषयी एक व्हिडियो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती काँग्रेस पक्ष आणि विशेष करून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हा व्यक्ती काँग्रेसचे लोकसभा उमेदवार अजय राय आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली
वरील पोस्ट शेयर करताना यूजरने लिहिले की, वाराणसीच्या काँग्रेस उमेदवाराचे, अजय रायचे म्हणणे ऐका. अडीच मिनिटांच्या व्हिडियोमध्ये या कथित अजय राय यांनी काँग्रेस पक्षाचे राजकारण, घराणेशाही, राहुल सोनिया-राहुल गांधी यांचे नेतृत्व आदी मुद्यांवर तोंडसुख घेतले आहे. तसेच नरेंद्र मोदीचे कौतुकही केले आहे.
काय आहे व्हिडियोमध्ये?
व्हिडियोतील व्यक्ती म्हणते, देखिए जब कल कोर कमिटी की बैठक होगी, तो उसमें हमे सोच समझ के चलना है. आज पुरे हिंदुस्थान के अंदर उसने (नरेंद्र मोदी) चिल्ला-चिल्लाकर मां-बेटे की राजनीती का सुपडा साफ करने की तैयार की है. ये परिवारवाद की राजनीती हमारी पार्टी (काँग्रेस) के लिए घातक है.
वो (मोदी) कुछ भी झूट नहीं बोलता. दस साल रिमोट की सरकार थी. मां-बेटे इस पार्टी का सफाया कर देंगे. कितनी अकल है उस में (राहुल) ये आप, हम सब जानते है. कब तक हम ढोएंगे उसे? और हिंदुस्थान का हिंदु राष्ट्रवाद से जुडा है.
कल जिस तरीके से उसने (मोदी) लोकसभा में एक-एक सवाल का जवाब दिया है…उसने करारे तमाचे दिए है…खींच-खींच के…और हमें स्वीकार करने पडेंगे. भले हम चिल्लाते रहे…प्रेस के सामने…मीडिया के सामने. हम तर्क नहीं दे पा रहे. हम कुतर्क देते है. हम गलत थे, हमारी पार्टी गलत थी, हमारी नीतियां गलत थी. हम मां-बेटे के गुलाम कब तक? जितनी जितनी उसको (मोदी) गालियां दी जा रही है, वो उतना उतना मजबूत होता जा रहा है. आज वो विश्व में इतना शक्तीशाली नेता बन चूका है, की अच्छे अच्छे देश उसको सलाम करते है. ये हमें देखना होगा, सोचना होगा.
परिवार की इस राजनिती को बाहर तो लाना होगा काँग्रेस को. नहीं तो दिक्कत हो जाएगी. और क्या हम ने ठेका लिया है क्या इस पार्टी की गुलामी कर ने का? हम और हमारे बच्चो को कब नंबर मिलेगा? (राहुल) क्या बोलता है, कैसे बोलता है, खुद को ही पता नही चलता. राष्ट्रीय अध्यक्ष बना बैठे है हम उसे.
ये मेरी व्यक्तीगत राय है. कल कोर कमीटी की मीटिंग में आप सब लोगों को सोच-समझ कर अपने अपने विचार प्रकट करने है. राष्ट्रहित की भी सोचनी है और अपने हित की भी बात सोचनी है. हम ने जो गलतियां की है, उनसे सबक सिखना होगा. और जब तक हम सबक नहीं सिखेंगे, तब तक हम सत्ता में नहीं आ सकते.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडियोतील व्यक्ती खरोखरंच अजय राय आहे का याची खात्री करून घेतली. खाली अजय राय यांचे मूळ फोटो आणि व्हिडियोतील व्यक्ती यांची तुलना केली आहे. अजय राय वापरत असलेला चष्मा आणि मिशीची ठेवण ही व्हिडियोतील व्यक्तीहून पूर्णपणे भिन्न आहे. यावरून स्पष्ट दिसते की, हा व्यक्ती अजय राय नाही.

मग आम्ही व्हिडियोतील स्क्रीनशॉट घेऊन ते गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून गौरव प्रधान या व्यक्तीने ट्विटर शेयर केलेला व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. 18 फेब्रुवारी 2019 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, अखेर काँग्रेस पक्षाचा हा कार्यकर्ता खरं बोलला. काँग्रेस पक्षाने त्यांचे ध्येय नेमके काय आहे, याचा सारासार विचार करावा. कोणाची गुलामी करायची? राहलु गांधी, प्रियंका गांधी यांची की, देशाची? युट्यूबवरदेखील हाच व्हिडियो उपलब्ध आहे.
अर्काइव्ह
म्हणजे दोन महिन्यांपूर्वी या व्हिडियोतील व्यक्ती अजय राय म्हणून नाही तर, काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून दावा करण्यात आला होता.
मग ही व्यक्ती आहे तरी कोण?
ऑल्ट न्यूजच्या पडताळणीनुसार व्हिडियोतील व्यक्तीचे नाव अनिल बूलचंदानी असे आहे. त्याने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा व्हिडियो अपलोड केला होता. ते कायम भाजपच्या समर्थनार्थ पोस्ट करीत असतात. त्यामुळे ते काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील नाहीत. हा व्हिडियो मुद्दामहून तयार करण्यात आला आहे.
निष्कर्ष
सदरील व्हिडियोतील व्यक्ती अजय राय किंवा काँग्रेसचा कार्यकर्तादेखील नाही. या व्यक्तीचे नाव अनिल बूलचंदानी असून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी हा व्हिडियो मुद्दामहून तयार केला होता. त्यामुळे अजय राय यांच्या नावाचा दावा करणाऱ्या पोस्ट असत्य आहेत.

Title:काँग्रेसच्या अजय राय यांनी खरंच मोदींची स्तुती करीत सोनिया-राहुल गांधीवर टीका केली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
