पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वी हरियाणातील एलेनाबाद शहरात झालेल्या घटनेचा आहे. 

काय आहे दावा ? 

भाजपचे झेंडे जाळतानाचा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “भाजपा विरोधात पंजाबमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत. गाडया तपासल्या जात आहेत. एका गाडीत भाजपाचे झेंडे मिळालेत. हे झेंडे जमा करून जाळले गेलेत. देशात नवी स्वातंत्र्य चळवळ सुरु झाली आहे. याची सुरुवात पंजाबमधून झाली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 पासून इंटरनेटवर उपलब्ध हे. 

बेबाक आवाज नावाच्या फेसबुक पेजवरील हाच व्हिडिओ शेअर करताना म्हटले होते की, “एलनाबाद विधानसभा पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपचे झेंडे जाळले.”

अर्काइव्ह

काँग्रेसचे हरियाणा प्रदेश सरचिटणीस विकास बन्सल यांनीसुद्धा हा व्हिडिओ ट्विट केला होता. 

https://twitter.com/INCBANSAL/status/1446545857730400256

आर्काइव्ह

हा धागा पकडून आम्ही अधिक सर्च केल्यावर कळाले की, 2021 मध्ये शेतकरी आंदोलन सुरु असताना हरियाणामध्ये भाजप नेते गोविंद कांडा एलनाबाद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. 

ई-समाचार या फेसबुक पेजवर या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध आहे. 

दैनिक जागरणच्या बातमीनुसार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अभय चौटाला यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एलनाबाद जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी नामांकन भरण्यासाठी जात असताना भाजप उमेदवार गोबिंद कांडा आणि तथाकथित संयुक्त किसान मोर्चाचे उमेदवार विकास पाचर यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. 2021 मध्ये हरियाणातील एलनाबादमध्ये हा विरोध झाला होता. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: False


Leave a Reply