नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला नाही; अॅनिमेशन क्लिप व्हायरल 

इस्रोची महत्त्वकांक्षी चंद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरले. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या नासाने चंद्रयान-3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ जारी केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ नासाने जारी […]

Continue Reading

वैश्विक किरणांमुळे मोबाईल दूर ठेवण्याची अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

अनेक मोबाईल वापरकर्त्यांना 20 जून रोजी सकाळी 10 वाजता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट मेसेज आला होता. अचानक आलेल्या या मेसेजवरून अनेक वावड्या उठल्या. उलटसुलट चर्चांना उधाण आले.  त्यात भर म्हणून एक मेसेज व्हायरल होऊ लागला की, मध्यरात्री पृथ्वीच्या जवळून वैश्विक किरणे जाणार असल्यामुळे सर्वांना आपापले मोबाईल दूर ठेवावे. सोबत नासा, बीबीसी आणि […]

Continue Reading

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच ‘नासा’ने 13 वी रास शोधून काढलेली नाही; वाचा सत्य

जगावर कोरोनाचे संकट असतानाच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने सुर्यमालेतील 13 वी रासेची जागा जगासमोर आणली आहे. या नवीन राशीचे नाव ऑफिउकस असे आहे, असा दावा समाजमाध्यमात काही जण करत आहेत. हा दावा खरा आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहण तथ्य पडताळणी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच […]

Continue Reading

पाच एप्रिलच्या रात्री उपग्रहाने भारताचे हे छायाचित्र घेतले नव्हते. वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करून पारंपारिक दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलची टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, दावा केला जात आहे की, उपग्रहाने 5 एप्रिल 2020 रोजी टिपलेल ते भारताचे […]

Continue Reading

घाबरू नका! 29 एप्रिल रोजी पृथ्वी नष्ट होणार नाही. ‘तो’ व्हिडिओ फेक आहे.

आधीच जग कोरोना विषाणूमुळे हैराण असून, आता नवीन संकट पुढे येऊन ठाकल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. येत्या 29 एप्रिलला संपूर्ण जग नष्ट होणार असल्याचा व्हिडियो लोकांमध्ये भीती पसरवित आहे. एक मोठा लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळणार असल्यामुळे सजीवसृष्टी नष्ट होईल, अशी चेतावणी या व्हिडियोमध्ये देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा […]

Continue Reading

अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियातील आहे. अमेरिकेच्या नासामधील नाही. वाचा सत्य

पहिल्या राफेल विमानाला सेवेत दाखल करण्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाच्या चकाखाली लिंबू ठेवले आणि टीकेची एकच झोड उठली. अंधाश्रद्धा की परंपरा असा यावरून वाद सुरू झाला. जगभरात केले जाणाऱ्या धार्मिक रितीरिवाजांचे दाखले देण्यात येऊ लागले. (उदा. जहाजाला प्रथम पाण्यात उतरविताना शॅम्पेनची बॉटल फोडणे). एवढेच नाही तर नासासुद्धा अंतराळवीरांना अवकाशात झेपवण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मानुसार […]

Continue Reading

रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेआधी उडपी श्रीकृष्ठ मठ आणि तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडियो बरेच गाजले होते. तसेच इस्रोच्या कोणत्याही मोहिमेआधी विधिवत पूजा करण्यावर नेहमीच टीका होते. याला उत्तर म्हणून सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील नासामध्ये मोहिमेआधी चर्चच्या फादरकडून विधी केले जात असल्याचे फोटो शेयर होत आहेत. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या […]

Continue Reading

ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे नील आर्मस्ट्रॉग म्हणाले होते का? वाचा सत्य

भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेमुळे सध्या सर्वत्र चंद्राविषयी चर्चा आहे. यात भर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या नावे सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरवला जात आहे. चंद्रावर चालून मला काही मिळाले नाही; पण ख्रिस्ताबरोबर चालून मला जीवन मिळाले, असे वक्तव्य आर्मस्ट्राँग यांनी केल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. […]

Continue Reading

‘चंद्रयान-2’ ने पाठवलेले पृथ्वीचे फोटो म्हणून जुनेच फोटो व्हायरल. पाहा सत्य काय आहे

भारतीय अंतराळ संस्थेच्या अथक प्रयत्नांतून तयार करण्यात आलेल्या संपूर्णतः स्वदेशी बनावटीच्या चंद्रयान-2 ने नुकतीच चंद्राकडे झेप घेतली. अंतराळात पोहचलेल्या या यानाने पृथ्वीचे विलोभनीय फोटो पाठविल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अवकाशातून घेतलेले हे फोटो नेटीझन्समध्ये कौतुकाचा विषय ठरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची तथ्य पडताळणी केली. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह […]

Continue Reading

VIDEO: नासाने पावसाचे ढग तयार करणारी मशीन बनवलेली नाही. हा रॉकेट चाचणीचा व्हिडियो आहे.

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पावसाचे ढग तयार करण्याचे एक खास तंत्रज्ञान केले असून, त्यामुळे मशीनद्वारे ढग तयार करून पाऊस पाडणे शक्य होणार आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. एका मिनिटाचा हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा […]

Continue Reading