चीनी हॅकर्समुळे व्हॉट्सअ‍ॅप डीपी न ठेवण्याचा तो मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

भारत आणि चीनचे संबंध ताणल्यानंतर सोशल मीडियावर फेक मेसेजचा ऊत आला आहे. आता दिल्ली पोलिस आयुक्तांच्या नावाने मेसेज फिरतोय की, आयसीस आणि चीनी हॅकर्स भारतीय युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप डीपी चोरून त्याचा गैरवापर करणार आहेत. त्यामुळे काही दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल फोटो ठेवू नये. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे सिद्ध झाले. काय आहे मेसेजमध्ये? मूळ […]

Continue Reading

लष्काराने गलवान खोऱ्यात 72 तासांत बांधलेल्या पुलाचे हे फोटो नाहीत. वाचा सत्य

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजीत संघर्ष झाला. त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले तर, चीनचेसुद्धा सैनिक मारले गेले. अशा परिस्थितही भारतीय लष्कराने न डगमगता केवळ 72 तासांत गलवान खोऱ्यातील नदीवर 60 मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले. ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक युजर्सने गलवान नदीवरील या लष्करी पुलाचे म्हणून […]

Continue Reading

इंदिरा गांधींचे हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील नाही. वाचा सत्य

इंदिरा गांधी यांचे पर्वतरांगेच्या पायथ्याशी सैनिकांना संबोधन करतानाचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली असता हा फोटो लेह येथील असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गलवान खोऱ्याला भेट दिल्याचे हे […]

Continue Reading

भारतीय सैन्याने मारलेल्या 56 चीनी सैनिकांची ‘ती’ यादी खरी नाही. वाचा सत्य

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. यावेळी चीनचेदेखील सैनिक मारले गेले. परंतु, चीनतर्फे मृतांचा अधिकृत आकडा किंवा नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. सोशल मीडियावर मात्र 56 चीनी सैनिकांच्या नावांची एक यादी व्हायरल होत आहे. ही यादी भारतीय सैनिकांनी मारलेल्या चीनी सैनिकांची असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंदर्भात […]

Continue Reading

भारत सरकारने 25 जूनपासून टिकटॉकवर बंदी घातली आहे का? वाचा सत्य

भारत आणि चीनमधील संबंध बिघडल्यानंतर देशात चीनी वस्तू व कंपन्यांविरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे. अशातच एक पोस्ट व्हायरल होत आहे की, भारत सरकारने टिकटॉक (TikTok) अ‍ॅपवर 25 जूनपासून बंदी घातली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे निष्पण्ण झाले. काय आहे पोस्टमध्ये? पोस्टमध्ये म्हटले की, भारत सरकारने अखेर निर्णय घेतला – 25 […]

Continue Reading

भारत-चीन संघर्षामध्ये जखमी झालेल्या सैनिकाचा म्हणून जुनाच फोटो व्हायरल. वाचा सत्य

गेल्या आठवड्यात भारत-चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये खिळे लावलेल्या रॉडने हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो जखमांनी भरलेल्या एका व्यक्तीचा पाठमोरा फोटो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तो चीनच्याच्या हल्ल्यात जखमी झालेला भारतीय सैनिक आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो 2016 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे […]

Continue Reading

भारताने चीनचे सैनिक मारले म्हणून कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन केले का? वाचा सत्य

भारतीय लष्कराने चीनचे सैनिक मारले म्हणून भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत रॅली काढून याचा विरोध केला, असा दावा केला जात आहे. यासोबत सीपीआयएम नेत्यांचे आंदोलनातील फोटो शेयर केले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे कळाले. काय आहे पोस्टमध्ये? सीपीआयएम नेत्यांचे हातात फलक घेऊन आंदोलन करतानाचे फोटो शेयर करून […]

Continue Reading