एअरफोर्स सर्जीकल स्ट्राईकचा व्हिडीओ खरा आहे का? सत्य पडताळणी

False आंतरराष्ट्रीय | International

https://i0.wp.com/www.factcrescendo.com/wp-content/uploads/2019/02/Thumbnail-2-nita-rao.png?w=640&ssl=1

26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कॅंम्पवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्याचा म्हणून एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असे म्हटले आहे की, हा व्हिडिओ हवाई हल्ला करताना, कॉकपिटच्या आतील भागातून घेतला आहे आणि हाच हवाई हल्ल्याचा खरा व्हिडीओ आहे.

सत्य पडताळणी

एआयएन न्यूज या फेसबुक पेजवर या व्हिडीओला 22 k व्हीव्ज मिळाले असून, 117 शेअर्स मिळाले आहेत, 56 कमेंटस् आहेत.

अर्काईव्ह

हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/abhijeet.shinde.9279/videos/10156261985879423/

अर्काईव्ह

  • या व्हिडिओची तथ्यता तपासण्यासाठी सर्वात प्रथम या व्हिडिओचा स्क्रिन शॉट घेवून गुगल रिव्हर्स ईमेज करुन शोधले असता एका व्हिडिओ गेमची लिंक मिळाली. |
  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर आमच्या टीमला youtube वर एक व्हिडिओ मिळाला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर असे आढळले की, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत या युट्युबवरील व्हिडिओतील गेमचा एक भाग दाखविण्यात आला आहे.
  • या व्हिडिओबद्दल अधिक माहिती घेतली असता, व्हायरल होणारा व्हिडिओ 2009 मध्ये बनवला गेलेला आहे. तसेच ‘Arma 2 नावाच्या खुली दुनियाचा सैन्य सिमुलेशन व्हिडिओ गेमचा हा एक भाग आहे.
  • हा गेम माईक्रोसॉफ्ट विंडोज साठी बोहेमिया इंटरअक्टिव्ह द्वारा विकसित आणि प्रकाशित करण्यात आला आहे.
  • हा व्हिडिओ 9 जुलै 2015 मध्येही youtube वर अपलोड करण्यात आलेला आहे.
  • या संदर्भात फॅक्ट क्रिसेंडोच्या टीमने फेसबुकवर व्हायरल होणारा व्हिडिओ आणि युट्युबवर असणारा व्हिडिओ या दोन्हीही व्हिडिओची तुलना केली असता, असे दिसून आले की, फेसबुक किंव्हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा युट्युबच्या गेममधील एक भाग आहे.

निष्कर्ष : संपुर्ण तथ्य पडताळणी केल्यानंतर एअरफोर्स सर्जीकल स्ट्राईकचा हा व्हिडीओ भारतीयांकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचा नसून, एका गेम मधील व्हिडिओचा भाग आहे. त्यामुळे सोशल मिडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा आहे.

Avatar

Title:एअरफोर्स सर्जीकल स्ट्राईकचा व्हिडीओ खरा आहे का? सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False