Fact Check : ISRO मध्ये आरक्षण नाही या म्हणण्यात किती तथ्य?

Mixture सामाजिक

भारत जगात तीन बाबतीत पुढं आहे आर्मी..क्रिकेट आणि इस्रो. विषेश म्हणजे तिन्हीत आरक्षण नाही अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‎Pramod Parab‎ यांनी ही पोस्ट एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा ऍड होइल त्याने १०० ऍड करावे  या ग्रुपवर शेअर केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी 

लष्कर, क्रिकेट आणि इस्त्रो या क्षेत्रात आरक्षण नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही याचा शोध घेण्यासाठी reservation in isro असे गुगलवर टाकले तेव्हा खालील परिणाम आमच्या समोर आला. 

या शोधादरम्यान आम्ही ISRO च्या संकेतस्थळावर गेलो. त्याठिकाणी आम्हाला इस्त्रोची एक जाहिरात दिसून आली. या जाहिरातीत स्पष्टपणे आरक्षित असलेल्या जागांची माहिती दिलेली दिसून येते. 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Archive)

भारतीय लष्करात आरक्षण आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला इकोनॉमिक टाईम्सचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार भारतीय लष्करात आरक्षण नसल्याचे दिसून येते. 

इकोनॉमिक टाईम्स / Archive 

लष्कराच्या सर्वसाधारण (सिव्हिल) ग्रुप सी आणि डी साठीच्या पदांसाठी मात्र आरक्षणाचे तत्व लागू असल्याचे दिसून येते. 

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी आपण येथे क्लिक करा (Archive)

भारतीय क्रिकेट संघात मात्र कोणत्याही प्रकारचे आरक्षण असल्याचे दिसून येत नाही. बीसीसीआयच्या संकेतस्थळावरही याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही. खासदार रामदास आठवले यांनी क्रिकेटमध्ये आरक्षणाची मागणी केल्याचे वृत्त द हिंदूने एक जुलै 2017 रोजी प्रसिध्द केल्याचे दिसून येते. द वायरनेही याबाबत एक लेख प्रसिध्द केल्याचे दिसून येते.  

निष्कर्ष

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) आणि भारतीय लष्करात काही प्रमाणात आरक्षण असल्याचे दिसून येते. भारतीय क्रिकेट संघात मात्र कोणत्याही प्रकारचे आरक्षण असल्याचे दिसत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे.  

Avatar

Title:Fact Check : ISRO मध्ये आरक्षण नाही या म्हणण्यात किती तथ्य?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture