
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अर्जेटिनाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी G-20 परिषदेत सहभागही नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी यांना 420 क्रमांक असलेले टी-शर्ट भेट देण्यात आले, असा दावा करणारे एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. सुनील वैद्य यांनी असेच एक छायाचित्र पोस्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत 420 क्रमांक असलेले टी-शर्ट भेट देण्यात आले का हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळाने 2 डिसेंबर 2018 रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तासोबत असलेल्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिफाचे अध्यक्ष यांच्या हातात असलेल्या टी-शर्टवर G-20 असे लिहिलेले असल्याचे आम्हाला दिसून आले.
द टाईम्स ऑफ इंडियाचे सविस्तर वृत्त / Archive
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच छायाचित्र 1 डिसेंबर 2018 रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिध्द केल्याचे आपण खाली पाहू शकता.
समाजमाध्यमात पसरत असलेल्या आणि मूळ छायाचित्राची तुलना फॅक्ट क्रेसेंडोने खाली केली आहे.
निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिफा अध्यक्षांनी दिलेल्या टी-शर्टचे छायाचित्र संपादित करुन त्यात G-20 ऐवजी 420 असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे छायाचित्र असत्य आढळले आहे.

Title:Fact Check : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 420 क्रमांकाचा टी-शर्ट देण्यात आला का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
