पश्चिम घाटातील रानफुलांसाठी प्रसिध्द असणाऱ्या कास पठारावर टाळेबंदीमुळे सध्या पर्यटक येत नाहीत. त्यामुळे आता फुलांनी हे पठार कसे बहरले आहे, असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र कास पठाराचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

kaas pathar.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

हे छायाचित्र कास पठारचे आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी anotherocean.tumblr.com या संकेतस्थळावर हे छायाचित्र दिसून आले. हे मूळ छायाचित्र इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आल्याचे येथे नमूद केले होते. त्यानंतर इन्स्टाग्रामवर या छायाचित्राचा शोध घेतला. त्यावेळी astrailor_jp या खात्यावरुन हे कुजू फुलाचे उद्यान असल्याचे म्हटले असल्याचे दिसून आले. या खात्यावर हे छायाचित्र 28 मे 2020 रोजी अपलोड करण्यात आलेले आहे.

संग्रहित

या फोटोग्राफरने काढलेले याच उद्यानातील इतर अनेक फोटोदेखील शेयर केलेले आहेत.

हे उद्यान कुठे आहे याचा शोध घेतला असता ते जपानमध्ये असल्याचे दिसून येते. या उद्यानाचे संकेतस्थळ आपण येथे पाहू शकता. या उद्यानाच्या ट्विटर खात्यावरही तुम्ही ही द्दश्ये पाहू शकता. जपान गाईड, ट्रिप अॅडव्हाझर या संकेतस्थळावरही जपानमधील या राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती आहे.

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, हे छायाचित्र कास पठार येथील असल्याचे असत्य आहे. जपानमधील कुजू या फुलांच्या राष्ट्रीय उद्यानातील हे छायाचित्र आहे.

Avatar

Title:कास पठारचे म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र कुठले आहे? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False