
अहमदाबाद येथील एक रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत असल्याचा दावा सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. अहमदाबादमधील फिनिक्स रूग्णालयाच्या छायाचित्रासह हा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.
काय आहे दावा?
अहमदाबाद येथील एक रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत आहे.
तथ्य पडताळणी
अहमदाबाद येथील रूग्णालयाकडून रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रूपये शुल्क घेण्यात येते का, याचा शोध घेतला. त्यावेळी अशा स्वरूपाचा दावा 2018 पासून करण्यात येत असल्याचे दिसून आले.
अहमदाबाद येथील ज्या रूग्णालयाच्या छायाचित्रासोबत ही माहिती समाजमाध्यमात पसरत आहे. त्या फिनिक्स रूग्णालयाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी असे कोणतेही शुल्क रूग्णास भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून आकारण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले. अहमदाबादमधील गुजरात कॅन्सर हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरकडून (Archive) रूग्णालयाने ठरविलेल्या वेळव्यतिरिक्त रूग्णाला भेटण्यास येणाऱ्या अतिरिक्त व्यक्तीकडून दहा रूपये इतके शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून येते. इंडियन मेडिकल असोसिएशननेही अशा स्वरूपाचे शुल्क अहमदाबादमधील कोणतेही रूग्णालय आकारण्यात येत असल्याचे अद्याप आढळले नसल्याचे स्पष्ट केले.
निष्कर्ष
अहमदाबाद येथील रूग्णालयात रूग्णास भेटावयास येणाऱ्या व्यक्तीकडून 500 रूपये आकारण्यात येते, हा दावा असत्य आढळला आहे.

Title:अहमदाबादमधील रूग्णालय रुग्णाला भेटायला येणाऱ्याकडून 500 रुपये शुल्क आकारत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
