गुजरातमधील मगरीचा व्हिडिओ पाकिस्तानचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

रहिवाशी भागात चक्क मगर आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. घरासमोरील रोडवर मगर पाहून तेथील रहिवाशांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे या व्हिडिओत दिसते. दावा केला जात आहे की, ही घटना पाकिस्तानातील कराची शहरातील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. हा व्हिडिओ पाकिस्तानातील नसून, गेल्या वर्षी गुजरातच्या वडोदरा शहरात आलेल्या मगरीचा आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओत गल्लीतील रस्त्यावर पाणी साचलेले दिसते. त्यात एका मगरीला पकडण्याचा लोक प्रयत्न करत आहेत. कॅप्शनमध्ये म्हटले की, कराची शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे रहिवाशी भागात मगर, सापे आणि विंचू आले आहे

ट्विटरआर्काइव

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम कराची शहरातील पावसाबद्दल माहिती घेतली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यात अनेकांचा मृत्यू झाला तर हजारो घरे उद्ध्वस्त झाली. परंतु, पुरामुळे मगर रहिवाशी भागात आल्याची काही माहिती मिळाली नाही.

मग व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने 5 ऑगस्ट 2019 हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्याचे आढळले. 

सोबत दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ गुजरातच्या वडोदरा शहरातील आहे. तेथील लालबाग राज्यस्थंभ सोसायटीमध्ये ही घटना घडली होती. मुसळधार पाऊस आणि लालबागचा तलाव भरल्यामुळे मगरी तलावातून बाहेर पडल्या आणि रहिवाशी भागात शिरल्या. 

जागरण आणि हिन्दुस्तान यांनी दिलेल्या बातम्यांनुसार, ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्या आठवड्यात वडोदरा शहरात खूप पाऊस झाला होता. त्यामुळे विविध रहिवाशी भागांत सुमारे 200 मगरी फिरताना आढळल्या.

प्रशासनाने सेना, पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करून मगरींना वन विभागाकडे सोपवण्यात आले. 

मूळ बातमी येथे वाचा – Live Hindustan

निष्कर्ष 

रहिवाशी भागात मगर आल्याचा तो व्हायरल व्हिडिओ कराची शहरातील नसून गुजरातमधील वडोदरा येथील आहे. गेल्या वर्षी गुजरातमधील अनेक भागात पूर आल्याने रस्त्यांवर मगरी आल्या होत्या. 

Avatar

Title:गुजरातमधील मगरीचा व्हिडिओ पाकिस्तानचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: False