
देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) विरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर या दोन्ही कायद्यांना समर्थन करण्यासाठी जमलेली गर्दी म्हणून काही छायाचित्रे पसरविण्यात येत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात CAB (CAA) आणि NRC च्या समर्थनार्थ खरंच नागरिक बाहेर पडले आहेत का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
काय पोस्टमध्ये?
तमिळनाडूमध्ये CAB आणि NRC च्या समर्थनार्थ उतरलेले नागरिक म्हणून दोन फोटो शेयर करण्यात आले आहेत.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील दोन्ही फोटोंची सत्यता तपासली असता कळाले की, हे दोन्ही फोटो CAB किंवा NRC च्या समर्थनासाठी तमिळनाडूमध्ये जमलेल्या लोकांचे नाहीत. ते फोटो जुनेच आहेत.
फोटो क्र. 1
गुगल रिव्हर्स इमेज केले असता तेलगु देसम या राजकीय पक्षाशी संबंधित अनेक फेसबुक पेज दिसून आले. यातील व्हॉईस ऑफ इनसाईड या पेजवर हे छायाचित्र 8 ऑक्टोबर 2018 रोजी अपलोड करण्यात आले होते. म्हणजेच हे छायाचित्र सध्याचे नसून जुने असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच त्याचा सध्याच्या CAB आणि NRC समर्थक आंदोलनाशी कोणताही संबंध नाही.
फोटो क्र. 2
हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अनेक तेलगू भाषिक संकेतस्थळावर हे छायाचित्र आढळले. जर्नलिस्ट कॅफे या संकेतस्थळावर 10 जानेवारी 2019 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या पदयात्रेच्या समारोप समारंभाचे हे छायाचित्र आहे. साक्षी तेलुगु वेबसाईटवरदेखील हा फोटो आहे.
न्यूज 18 तेलगूनेही छायाचित्राची गॅलरी दिली असून यात आपण हे छायाचित्र पाहू शकता. याचाच अर्थ हे छायाचित्र तामिळनाडूमधील नसून आंध्र प्रदेशमधील आहे. या छायाचित्राचा CAB आणि NRC समर्थनाशी कोणताही संबंध नाही.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, पोस्टमधील दोन्ही फोटो जुने आणि आंध्र प्रदेशमधील आहेत. तमिळनाडू येथे CAB आणि NRC ला समर्थन देण्यासाठी जमलेल्या लोकांचे हे फोटो नाहीत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली.

Title: तमिळनाडूमधील CAA व एनआरसी समर्थकांचे फोटो नाहीत. ते जुने व असंबंधित फोटो आहेत. वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
