भगतसिंग यांच्या बहिणीच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Partly False सामाजिक

शहीद भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे आज (2 जून) निधन झाले, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशातील एकाही राजकीय नेत्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही अशी तक्रार नेटकरी करीत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता ही बातमी सहा वर्षे जुनी असल्याचे आढळली. 

bhagatsingh Sister.png

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे कधी निधन झाले याचा शोध घेतला. महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर 29 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार शहीद भगतसिंग यांच्या भगिनी प्रकाश कौर यांचे कॅनडा येथे 2014 मध्ये निधन झाले होते. 

Mata.png

महाराष्ट्र टाईम्स / संग्रहित

दिव्य मराठी, हिंदूस्थान टाईम्स, द हिंदू, शीख सियासत या संकेतस्थळावरही याबाबतचे वृत्त दिसून आले. त्यानंतर इंडिया टूडेच्या संकेतस्थळावर आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 29 सप्टेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेले खालील वृत्त आढळले. त्यानुसार, भगतसिंग यांच्या बहिणीचे कॅनडामध्ये निधन झाले होते.

india today.png

इंडिया टूडे / संग्रहित

डे अॅड नाईट न्यूज या पंजाबी युटूयूब चॅनलने 29 सप्टेंबर 2014 रोजी दिलेले वृत्तही आपण खाली पाहू शकता.

संग्रहित

निष्कर्ष

यातून हे स्पष्ट झाले की, भगतसिंग यांची बहीण प्रकाश कौर यांचे निधन 2014 मध्ये झाले आहे. त्यांच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल होत आहे. त्यामुळ त्यांचे निधन 2020 मध्ये झाल्याचा दावा असत्य आहे. 

Avatar

Title:भगतसिंग यांच्या बहिणीच्या निधनाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False