पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये नुकतेच अम्फान या वादळाने तडाखा दिला. चक्रीवादळामुळे तेथील अनेक झाडे उन्मळून पडली तर, अनेक घरे आणि वाहनांचेसुद्धा नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर एका दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचा फोटो सोशल मीडियावर पसरवून दावा केला जातोय की, हा रोड पश्चिम बंगालमधील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता, हा फोटो जुना आणि बंगालमधील नसल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

निकृष्ट रस्त्यावरील डांबराचा थर बाजूला सरकलेला फोटो शेयर करून म्हटले की, हा रस्ता बंगाल सरकारने बांधला आहे.

Claimdds.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा फोटो गेल्या अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ येण्यापूर्वी म्हणजे अगदी डिसेंबर 2019 पासून हा फोटो शेयर केला जात आहे.

मलेशिया भाषेतील ब्रदरहुड मलेशिया नामक फेसबुक पेजवरून 26 डिसेंबर 2019 रोजी हा फोटो सर्वप्रथम शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

त्याचप्रमाणे लेक्स ऑटोपार्ट्स नामक मलेशियातील पेजवरूनही हा फोटो 26 डिसेंबर 2019 रोजी पोस्ट करण्यात आला होता. तसेच काही ट्विटर युजर्सनेदेखील 30 डिसेंबर रोजी हा फोटो शेयर केल्याचे आढळले.

अधिक शोध घेतला असता हायटेक्नो वेबसाईटनेदेखील या फोटोविषयी बातमी छापल्याचे आढळले. 20 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या या बातमी म्हटले की, नेमका कशामुळे हा रस्ता खराब झाला हे जरी स्पष्ट नसले तरी निकृष्ट दर्जाचे काम आणि मुसळधार पाऊस यासाठी कारणीभूत असू शकतो.

sfsssfsf.png

मूळ बातमी येथे वाचा – हायटेक्टनोअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, एक तर हा फोटो जुना आहे. दुसरे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये नुकतेच आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झालेला हा रस्ता नाही. हाच फोटो काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील म्हणूनही व्हायरल झाला होता. फॅक्ट क्रेसेंडोच्या श्रीलंका टीमने त्याचे फॅक्ट केले होते.

Avatar

Title:पश्चिम बंगालच्या नावाखाली नुकसान झालेल्या रस्त्याचा जुना आणि असंबंधित फोटो व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False