भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकविल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? वाचा सत्य

False राजकीय | Political

भारतात कोणीही जर पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर त्या व्यक्तीवर कोणतीही सुनवाई न करता थेट देशद्रोहाचा खटला चालविण्याचा गृह मंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतला, असा मेसेज व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, गृह मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अनेक वर्षांपासून हा फेक मेसेज व्हायरल होत आहे. 

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर गृह मंत्रालयाने खरंच असा काही निर्णय घेतला का याची माहिती घेतली. इंटरनेटवर याबाबत एकही बातमी आढळली नाही. इतका मोठा निर्णय घेण्यात आला असता तरी नक्कीच त्याची मोठी बातमी झाली असती. परंतु, असे काहीही दिसून येत नाही. 

अमित शहा यांच्या ट्विटर अकाउंटवर किंवा गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा या निर्णयाची घोषण केल्याचे आढळून येत नाही. अमित शहा यांच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील त्यांनी पाकिस्तानी झेंडा फडकावणाऱ्यांविरोधात असा काही निर्णय घेतल्याची माहिती आढळून आली नाही.

विशेष म्हणजे गृह मंत्रालयातर्फे ऑक्टोबर महिन्यात एकही प्रेस रिलीज जारी करण्यात आलेली नाही. तसेच वेबसाईटवर उपलब्ध प्रेस रिलीजमध्येसुद्धा व्हायरल दाव्याप्रमाणे निर्णयाची माहिती आढळली नाही. 

यावरून प्रश्न उपस्थित होतो की, गृहमंत्रालयाने खरंच असा काही निर्णय घेतला आहे का?

गेल्या जून महिन्यात पंजाबस्थित सामाजिक कार्यकर्ते हरमिलाप गिरवाल यांनी माहितीचा अधिकार वापरून गृह मंत्रलायाकडे माहिती मागितली होती की, भारतात कोणकोणत्या परराष्ट्रांचे झेंडे फडकविणे बेकायदेशीर आहे आणि तसेच कोणत्या विदेशी क्रीडा संघाचा जयजयकार करण्यावर बंदी आहे. 

याला उत्तर देत्ताना गृह मंत्रालयाने स्पष्ट सांगितले होते की, त्यांच्याकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. 

मागे अनेकदा हा मेसेज व्हायरल झालेला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तेव्हा गृह मंत्रालयाशी संपर्क साधला होता. तेथील पत्र व सूचना विभागाच्या (पीआयबी) अधिकाऱ्याने हे वृत्त असत्य असल्याचे स्पष्ट केले होते.

ते म्हणाले की, भारतात कुठेही आणि कोणीही पाकिस्तानचा झेंडा फडकविला तर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालविला जाईल, असा गृहमंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतलेला नाही. तशी कोणतीही माहिती विभागाकडे आलेली नाही.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे. अमित शहा किंवा गृह मंत्रालयाने पाकिस्तान झेंडा फडकविणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालविण्याचा निर्णय घेतलेला नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकविल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False