‘बेस्ट’ने मुंबईत ईलेक्ट्रिक टॅक्सी सुरू केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

False सामाजिक

मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टने आता ईलेक्ट्रिक टॅक्सीसेवा सुरू केल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. सोबत लाल रंगाच्या एका कारचा फोटो शेअर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा खोटा आहे. बेस्टने अशी कोणतीही सेवा सुरू केलेली नाही.

काय आहे दावा?

मुंबईतील घाटकोपरमध्ये ईलेक्ट्रिक टॅक्सीसेवा सुरू झाली, अशा दाव्यासह खालील फोटो व्हायरल होत आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

बेस्टने खरंच अशी काही सेवा सुरू केला का याचा शोध घेतला असता कळाले की, हा दावा खोटा आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने ट्विटरवरुन खुलासा केली की, सदर फोटो आणि दावा असत्य आहे.

बेस्टच्या प्रसिद्धपत्रकात म्हटले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका लाल रंगाच्या मोटार कार वर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्ती असा फोटो व्हायरल केला जात आहे.’

‘या फोटोमुळे मुंबईकर जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बेस्ट उपक्रमाने खरोखरच अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरू केली आहे का? किंवा भविष्यकाळात सुरू करण्याच्या विचार आहे का? अशा प्रकारचे विविध गैरसमज या फोटो आणि मजकुरामुळे निर्माण झालेले आहेत.’

‘अशा प्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आलेली नसून नजिकच्या काळात तशा प्रकारची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे मुंबईकर जनता, बेस्ट प्रवासी त्याचप्रमाणे पत्रकार अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही छायाचित्र किंवा मजकुरावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, बेस्टने मुंबईत ईलेक्ट्रिक टॅक्सीसेवा सुरू केलेली नाही. सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे. सदरील फोटोबाबत मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.

Avatar

Title:‘बेस्ट’ने मुंबईत ईलेक्ट्रिक टॅक्सी सुरू केल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False