Fact : मुर्शीदाबादमधील तिहेरी खून प्रकरण धार्मिक नव्हे तर आर्थिक वादातून

False राजकीय | Political सामाजिक

#ईस्लामि_मॉब_लिंचिग (Likes पेक्षा Share करा ) पश्चिम बंगाल ( भारत) हे आहेत R.S.S. चे कार्यकर्ते प्रकाश पाल. त्यांची ८ महिन्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि ६ वर्षे वयाचा मुलगा यांचा अपराध फक्त एकच .. ते सनातन हिंदु धार्मिक होते आणि दुर्गापुजेत सहभागी होते. काल रात्री काही मुस्लिमानी त्यांच्या याच गुन्ह्याबद्दल त्या तिघांनाही अत्यंत निर्घुणपणे मारले कुठे आहेत मॉब लिंचिग च्या नावाने बोंबलनारे कॉग्रेसी कम्युनिस्ट XXX प्रत्येकाला याच उत्तर शोधाव लागेल, अशी माहिती Ajay Nanavare यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुकवरील मुळ पोस्ट 

तथ्य पडताळणी 

मुर्शीदाबादमधील तिहेरी खून नेमका कुठल्या कारणाने झाला. याला काही धार्मिक बाजू आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुर्शीदाबाद असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला दैनिक सामनाच्या संकेतस्थळाने दिलेले खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे म्हटले आहे. या वृत्तात नेमके काय म्हटले आहे हे आपण खाली पाहू शकता. 

दैनिक सामना / Archive 

बीबीसीला पश्चिम बंगाल पोलिसांचे सहाय्यक महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) ज्ञानवंत सिंह यांनी सांगितले की, याला कोणताही राजकीय अथवा धार्मिक वाद नाही. याबाबत समाजमाध्यमात चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. 

 बीबीसी / Archive

पश्चिम बंगालमधील जियागंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिश्वजीत घोषाल यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनीही या कोणताही धार्मिक वाद नसल्याचे स्पष्ट केले

निष्कर्ष 

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील जियागंज येथे घडलेले तिहेरी हत्याकांड हे धार्मिक आणि राजकीय कारणावरुन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक कारणावरुन हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Avatar

Title:Fact : मुर्शीदाबादमधील तिहेरी खून प्रकरण धार्मिक नव्हे तर आर्थिक वादातून

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False