
मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाच सध्या सोशल मीडियावर जुने फोटो व्हायरल होत आहेत. प्रसारमाध्यमांकडूनही असे जुने फोटो संग्रहित किंवा सांकेतिक छायाचित्र असा शब्दप्रयोग न करता वापरण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम पसरत आहे, अशाच एक छायाचित्राची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. कारभार रत्नागिरीचा साप्ताहिक या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आली आहे. मुंबईतील पावसाची माहितीही या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
तथ्य पडताळणी
मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाचे हे छायाचित्र मुंबईतीलच आहे का? असल्यास ते नेमके कधीचे आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही हे छायाचित्र रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोधले.
या परिणामामध्ये आम्हाला झी न्यूजचे खालील वृत्त दिसून आले. हे वृत्त 10 जुलै 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. यात मुंबईतील पावसाचे तत्कालीन अपडेट देण्यात आले आहेत. या वृत्तातील या छायाचित्राचे श्रेय हे पीटीआय या वृत्तसंस्थेला देण्यात आले आहे.
टाईम्स नाऊ या संकेतस्थळानेही 10 जुलै 2018 रोजी या छायाचित्रासह मुंबईतील पाऊसाचे वृत्त वृत्त प्रसिध्द केले आहे. राज्यसभा टीव्हीच्या संकेतस्थळावरही 10 जुलै 2018 रोजी हे छायाचित्र वापरण्यात आले आहे.
द क्विंटने दिलेल्या एका वृत्तातही हे छायाचित्र मिठी नदीच्या जवळच्या भागातील दहिसर भागातील 2018 मधील असल्याचे म्हटले आहे.
निष्कर्ष
मुंबईतील 2018 मधील पावसाचे पीटीआय या वृत्तसंस्थेने घेतलेले हे छायाचित्र आहे. समाजमाध्यमांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये 2019 मधील पावसाचे म्हणून हे छायाचित्र वापरण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही बाब असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : मुंबईतील पावसाचे जुने फोटो होतायेत व्हायरल?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
