
सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे म्हणून एक छायाचित्र सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. आठवतंय का काही हीच ती अतृप्त(तृप्ती) अशी माहिती देत हिंदूराष्ट्र सेनेचा माऊली टोन्पे यांनीही हे छायाचित्र पोस्ट केले आहे. हे छायाचित्र भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
हे छायाचित्र सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेच आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला याच्या परिणामात द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावरील 11 नोव्हेंबर 2014 रोजीचे एक वृत्त दिसून आले. हे छायाचित्र त्यावेळी करण्यात आलेल्या संस्कृती रक्षकांच्या छळाविरोधात तरुणाईने केलेल्या किस ऑफ लव्ह या चळवळीचे आहेत.
द टाईम्स ऑफ इंडियाचे सविस्तर वृत्त / Archive
या व्यतिरिक्त बेंगलोर मिररनेही (संग्रहण) हे छायाचित्र 11 नोव्हेंबर 2015 रोजी प्रसिध्द केलेले आहे. याच जोडप्याचे एपी या वृत्तसंस्थेने घेतलेले एक छायाचित्र ब्रिटनमधील प्रॉस्पेक्ट या मासिकाने 19 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिध्द केल्याचे दिसून आले.
प्रोस्पेक्ट मासिकातील लेख / Archive
निष्कर्ष
हे छायाचित्र सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे नाही. किस ऑफ लव्ह चळवळीतील जोडप्याचे हे छायाचित्र आहे.

Title:‘किस ऑफ लव्ह कॅम्पेन’चा फोटो तृप्ती देसाई यांचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
