
सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी बिहारहून आलेल्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले होते. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी केंद्राने मान्य केली. आता दावा केला जात आहे की, विनय तिवारी यांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तापस करणाऱ्या सीबीआय टीममध्ये डेप्युशनद्वारे सामील करून घेण्यात आले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक ।
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम विनय तिवारी यांना खरंच सीबीआयमध्ये पाठवण्यात आले का, याची तपासणी केली. इंटरनेटवर तशी कोणतीही बातमी आढळली नाही. पाटणा येथे पोलिस अधीक्षक असणाऱ्या तिवारी यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासले.
तिवारी यांनी ट्विटर माहिती दिली की, त्याच्या नावाने सध्या विविध बातम्या पसरविल्या जात आहेत. त्या सर्व खोट्या आणि निराधार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले.
तिवारी यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एका व्यक्तीने कमेंट केले होते की, अमित शहा यांनी तिवारी यांची सीबीआयमध्ये बदली केली. याला उत्तर देताना तिवारी यांनी म्हटले की, ही निव्वळ अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नये.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
फॅक्ट क्रेसेंडोने मग विनय तिवारी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सोशल मीडियावरील सर्व दाव्याचे खंडन करीत सांगितले की, सुशांत मृत्यूप्रकरणी तपास करण्यासाठी त्यांना सीबीआयमध्ये पाठवण्यात आलेले नाही. या सर्व अफवा आहेत.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी सीबीआयमध्ये डेप्युटेशनवर पाठविण्यात आल्याची बातमी खोटी आहे. तिवारी यांनी स्वतः याचे खंडन केले.
(वाचकांना जलद आणि अचूक माहिती देण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने सुरू केली आहे चॅटबॉटची सुविधा. 9049053770 हा क्रमांक सेव्ह करा आणि पाठवा तुमची फॅक्ट-चेक रिक्वेस्ट.)

Title:आयपीएस विनय तिवारी यांना डेप्युटेशनवर सीबीआयमध्ये पाठविल्याच्या बातम्या फेक; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
