वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल

False सामाजिक

अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सोशल मीडियावर आता एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो आयोध्येमधील राम मंदिराच्या बांधकामाचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा फोटो वाराणशीमधील काशी विश्वानथ मंदिराचा आहे.

काय आहे दावा

सोशल मीडियावर एका मंदिराच्या बांधकामाचा फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘आयोध्यामधील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच पहिला फोटो

मूळ पोस्ट येथे बघा – फेसबुकआर्काइव्ह 

तथ्य पडताळणी 

गुगल रिव्हर्स इमेज सर्चने मधून कळाले की, हा फोटो आयोध्येतील राम मंदिराचा नाही. 

हिंदुस्तान टाईम्सने 30 ऑक्टोबर रोजी दिलेल्या बातमीत सदरील फोटो दिलेला आहे. त्यानुसार, वाराणसी येथील काशी विश्वानाथ मंदिराच्या विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामाचा हा फोटो आहे. एकुण 24 इमारती या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणार असून, हा फोटो काशी विश्वनाथ मंदिराच्या मुख्य कॉप्लेक्सच्या बांधकामाचा आहे. 

मूळ बातमी – हिन्दुस्तान टाईम्सआर्काइव्ह 

वाराणशीमधील घाटांवरूनही काशी विश्वनाथांचे मंदिर दिसेल अशा प्रकारे हा महाप्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. मंदिराच्या सौंदर्यकरणाचा हा प्रकल्प पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असे बातमी म्हटले आहे. 

थोडक्यात काय तर हा आयोध्येतील राम मंदिराचा फोटो नाही. 

मग राम मंदिराचे काम कुठपर्यंत आले आहे?

आयोध्येतील श्री राम जन्मभूमी संचालक मंडळाचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सदरील फोटोबाबत केला जाणारा दावा फेटाळला आहे. तसेच त्यांनी माहिती दिली की, राम मंदिराचे सध्या फक्त तळभागाचे काम झाले आहे.

त्यांनी ट्विटरवर याचा फोटोदेखील शेयर केलेला आहे. 

मूळ ट्विट – ट्विटरआर्काइव्ह 

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, वाराणशी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा फोटो आयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा म्हणून शेयर केला जात आहे.

Avatar

Title:वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल

Fact Check By: Milina Patil 

Result: False