पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळाल्यावर रॅप साँग गायले नाही; वाचा सत्य

राजकीय | Political

पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर एका वादग्रस्त रॅप साँगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा गाण गातो की, “मी दारूच्या नशेत दोन लोकांना उडवले. माझ्या वडिलांकडे भरपूर पैसे आहे. मला एका दिवसात जामीन मिळाला असून मी परत कार घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये रॅप साँग गाणारा मुलगा पुण्यातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये पुण्यात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक अल्पवयीन मुलागा वादग्रस्त रॅप साँग गाताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पुणे: ड्रंक अँड ड्राइव्ह मधील आरोपीचा रॅप सॉंग मधून माजोरेपणा उघड.” 

एनडीटीव्ही मराठी आणि मराठी हिंदुस्तानटाईम्स या सारख्या अनेक वृत्तवेबसाईट्सनीदेखील वदग्रस्त गाण्याची क्लिप शेअर करत सांगितले की, पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाला जामीन मिळाल्यानंतर त्याने हे रॅप साँग गायले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

पुढे कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये रॅप साँग गाणारा मुलगा हा आरोपी वेदांत अग्रवाल नाही.

सुनैना होले नामक युजरने 23 मे 2024 रोजी ट्विटवर एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत सांगितले की, हा व्हिडिओ “आर्यन क्रिंगिस्टन 2” नामक इंस्टाग्रामवरून बनवण्यात आला आहे.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर ‘लिब्रेनाइट X क्रिंगिस्टन2’ नावाचे अकाउंट आढळले. अकाउंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार युजरचे नाव ‘आर्यन देव नीखरा’ असून तो दिल्लीचा राहिवासी आहे.

इंस्टाग्राम

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील वादग्रस्त रॅप साँग गाणारा आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर दिसणारा मुलागा एकच आहे.

आर्यनने इंस्टाग्रामवरून व्हायरल दाव्याचे खंडन करत सांगितले की, “व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझा असून माध्यमांवर आणि सोशल मीडियावर हा पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाती अल्पवयीन आरोपी म्हणनू शेअर केला जात आहे.”

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्यावर इंटरनेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येकजण हे करतो, एक इशारा पुरेसा असेल, मी पुणे सायबर स्टेशनला केस मागे घेण्याची विनंती करतो. मला आणि माझ्या कुटुंबाला जगू द्या, मी फक्त एक कंटेंट क्रिएटर आहे.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तसेच फ्री प्रेस जर्नलच्या बातमीनुसार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्राईम ब्रँचचे एसीपी सुनील तांबे यांनी सांगितले की, “पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्यांचा नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा आहे.”

तसेच अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल माध्यमांना सांगतात की, “व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की, कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या.” संपुर्ण बातमी येथे वाचू शकता.

https://www.instagram.com/reel/C7Ub42IPJNz/?utm_source=ig_web_copy_link

निष्कर्ष 

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त रॅप साँग गाणारा मुलगा पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी नाही. या मुलाचे नाव ‘आर्यन देव नीखरा’ असून तो दिल्लीचा राहिवासी आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Avatar

Title:पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळाल्यावर रॅप साँग गायले नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply