युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या नावाखाली व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, युक्रेनमधील विविध शहरांमध्ये हल्ले झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.

सोशल मीडियावर युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्याचे म्हणून अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत. यात बहुतांश व्हिडिओ एक तर जुने किंवा रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित नसलेले आहेत.

सामाना वृत्तपत्राच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनसुद्धा असाच एक व्हिडिओ रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा म्हणून शेअर करण्यात आला आहे. परंतु, ही क्लिप म्हणजे चक्क व्हिडिओ गेममधील फुटेज आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

यात रात्रीच्या वेळी इमारतीच्या पार्श्वभूमीवर आकाशात क्षेपणास्त्रांचा वर्षाव होताना दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले, की “रशिया-युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली असून रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ला केला आहे. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुकट्विटरअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

या व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गेल्या वर्षीपासून इंटेरनेटवर उपलब्ध आहे. रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी रोजी सैन्य कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. म्हणजे या घोषणेआधीचा हा व्हिडिओ आहे.

पॅनड्रोमोडो नावाच्या एका गेमिंग युट्यूब अकाउंटवर हा व्हिडिओ 15 डिसेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. 

“The Iron Dome in War Thunder” असे या व्हिडिओचे शीर्षक आहे. 

वॉर थंडर काय आहे?

वॉर थंडर हा व्हिडिओ गेम आहे. हा एक मल्टीप्लेयर कॉम्बॅट गेम आहे. यामध्ये युद्धविमान, हेलिकॉप्टर, सैन्यदल, नौदल आदीसह अत्यंत वास्तव ग्राफिक्स असलेली लढाई करता येते.

या व्हिडिओ गेमचे युट्यूब चॅनेल आपण येथे पाहू शकता

फॅक्ट क्रेसेंडोने याआधीसुद्धा व्हिडिओ गेममधील फुटेज खऱ्याखुऱ्या युद्धाचे म्हणून शेअर केलेल्या दाव्यांचे फॅक्ट चेक केलेले आहे. ते तुम्ही येथे, येथे आणि येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, वॉर थंडर नावाच्या एका गेममधील क्लिप रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा म्हणून शेयर केली जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या नावाखाली व्हिडिओ गेमची क्लिप व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False