सध्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार झाले असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपीएटीची चोरी झाली. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सीलबंद करताना दिसतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये चोरी झालेले व्हीव्हीपीएटी दाखवले नाही. त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सुचनानुसार कर्मचारी व्हीव्हीपीएटी मशीन मधून स्लिप काढून ते सीलबंद करत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिमध्ये रंगेत ठेवलेल्या व्हीव्हीपीएटी मशिन दिसतात आणि काही लोक मशिनमधील मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात सीलबंद करताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील निवडणुका झाल्या. ज्या ठिकाणी EVM आहेत त्या ठिकाणाहून व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला जात आहेत. ईव्हीएम मशिन पूर्ण सुरक्षेत ठेवण्यात आले आहे असा खोटा दावा करण्यात येत आहे...हे पाहून असे वाटत आहे की, देशाची लोकशाही धोक्यात आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

हाच व्हिडिओ शेनाझ नामक युजरने 13 डिसेंबर 2022 रोजी ट्विटवर शेअर केला होता.

सोबतच दावा केला होता की, “भावनगरमधील भाजप कार्यकर्ते आपल्या पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी व्हीव्हीपीएटी स्लिपमध्ये हेराफेरी करत आहेत.”

https://twitter.com/WeThePeople3009/status/1602581478021697536

आर्काइव्ह

भावनगर जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी या ट्विटची दखल घेत स्पष्ट केले की, “निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतांची मोजणी झाल्यानंतर, व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप काढल्या जातात आणि एका काळ्या लिफाफ्यात सीलबंद केले जातात. जेणेकरून पुढील निवडणुकांसाठी व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर करता येईल. ही संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येते आणि त्याची एक प्रत स्ट्राँग रूममध्ये तर दुसरी प्रत संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) कडे पाठवली जाते.”

https://twitter.com/Collectorbhav/status/1603309347597348865

आर्काइव्ह

निवडणूक आयोगाची मतदानानंतरच्या सूचना

खालील सूचनांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपीएटी (VVPAT) मशीन ड्रॉप बॉक्समधून स्लिप काढल्या जातात. मतदान केंद्रानुसार जाड काळ्या कागदाच्या लिफाफ्यात ठेऊन रिटर्निंग ऑफिसरला आयोगाने दिलेल्या द्विभाषिक गुप्त सीलसह लाल मेणाचा वापर करून ते लिफाफे सील केले जातात.

व्हायरल व्हिडिओमध्ये वरील प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनांचा एक भागाची तिच प्रक्रिया सांगितली आहे.

केरळ राज्यातील निवडणूक आयोग अधिकाऱ्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमध्ये व्हीव्हीपीएटी मशीनमधून स्लिप काढण्याची आणि संग्रहित करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. या ठिकाणी कुठेही संशयास्पद गतिविधी दिसत नाही. मतदान संपल्यानंतर या मशीन्स उच्च सुरक्षिततेच्या वातावरणात संग्रहित केल्या जातात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केल्याप्रमाणे अशी कोणतीही क्रिया करणे शक्य नाही.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये चोरी झालेले व्हीव्हीपीएटी दाखवले नाही. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सुचनानुसार कर्मचारी व्हीव्हीपीएटी मशीन मधून स्लिप काढून ते सीलबंद करत होते.

तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला गेल्याचा दावा खोटा; वाचा सत्य 

Written By: Sagar Rawate

Result: Misleading