सध्या सोशल मीडियावर शिमला मिरचीमध्ये जगातील सर्वात लहान विषारी साप सापडला या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होते आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील प्राणी मानवांसाठी हानिकारक नाही.

काय दावा आहे ?

व्हायरल व्हिडिओमध्ये शिमला मिरची कापल्यावर त्यामध्ये एक लहान कीटक दिसतो. हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा जगातील सर्वात लहान विषारी साप म्हणून ओळखला जातो आणि तो बर्याचदा हिरव्या मिरचीमध्ये आढळतो. कृपया वापरण्यापूर्वी तुमची हिरवी मिरची नेहमी कापून घ्या, जरी ती दळण्यासाठी असली तरीही ती सलाडसाठी वापरली तरीही ती विषारी असते. आपण परिस्थितीला बळी पडू नये.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ‘जगातील सर्वात लहान साप’ सर्च केल्यावर कळाले की, ‘बार्बाडोस थ्रेड स्नेक’ हा जगातील सर्वात लहान साप आहे. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या कीटकापेक्षा हा साप वेगळे आढळला.

मूळ पोस्ट – एनिमल फॅक्ट

पुढील रिव्हर्स इमेज द्वारे सर्च केल्यावर कळाले की, शिमला मिरचीमध्ये सापडलेला एक प्रकारचा जंतू आहे. या जंतुला हॉर्स हेअर वर्म असे म्हणतात.

या अळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फॅक्ट ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-सेंटर ऑफ इकोलॉजिकल सायन्सेस’ या विभागातील प्रोफेसर वीणा टंडन यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यानी सांगितले की, “व्हायरल व्हिडिओमधिल दिसणारा कीटक एक अळी आहे. तिला ‘हॉर्सहेअर वर्म’, ‘गॉर्डियास’ किंवा ‘नेमॅटोमोर्फा’ असेदेखील म्हणतात. ही अळी माती, पाणी आणि वनस्पतींमध्ये राहते. तसेच ही अळी हानिकारक नाही.

https://www.youtube.com/watch?v=bQKgtJqNp8E

अमेरिकन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी आणि कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते, हॉर्सहेअर वर्म मानवांसाठी हानिकारक नाही. हॉर्सहेअर वर्म वनस्पतींमध्ये कीटक नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.

द एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिक्सने हॉर्सहेअर वर्मसचा संसर्ग टाळण्यासाठी भाज्या वापरण्यापूर्वी योग्य प्रकारे धुण्याचा आणि निर्जंतुक करण्याचा सल्ला दिला आहे.

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओमध्ये जगातील सर्वात लहान व विषारी साप नाही. हा व्हिडिओ हॉर्सहेअर वर्म असून मानवांसाठी हानिकारक नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:शिमला मिरचीमध्ये जगातील सर्वात लहान विषारी साप सापडला का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False