
इटली सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडे कोरोना विषाणूपुढे शरणागती पत्करली आहे. आम्ही देशातील कोणत्याच नागरिकाला वाचवू शकत नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरत आहे. पुंडलिक यशोदा लक्ष्मण धुमाळ, वसंत नाडकर्णी यांनीही अशी माहिती पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
इटलीने जागतिक आरोग्य संघटनेला आपण कोरोना विषाणूपुढे शरणागती पत्करत असल्याचे म्हटलंय का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी असे कोणतेही वृत्त आढळून आले नाही. इटलीचे पंतप्रधान जिसेप कोन्टे यांच्या ट्विटर खात्यावरही अशी कोणतीच बाब आढळली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरही अशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. इटलीचे पंतप्रधान जिसेप कोन्टे यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार असल्याचे आयटीव्हीने 22 मार्च 2020 रोजी दिलेले वृत्त दिसून आले.

आयटीव्हीने दिलेले सविस्तर वृत्त / Archive
इटलीच्या पंतप्रधानाचे वक्तव्य म्हणून असलेल्या समाजमाध्यमातील संदेशासोबत छायाचित्र हे इटलीचे पंतप्रधान जिसेप कोन्टे यांचे नसून ते इटलीचे राष्ट्रपती सेर्जियो मात्तारेल्ला यांचे असल्याचेही दिसून येते. आपण त्यांच्या छायाचित्राची तुलना खाली पाहू शकता.

यातून हे स्पष्ट होत आहे की, इटलीने जागतिक आरोग्य संघटनेपुढे आपण कोरोना विषाणूपुढे शरणागती पत्करत असल्याचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
निष्कर्ष
इटलीने जागतिक आरोग्य संघटनेपुढे आपण कोरोना विषाणूपुढे शरणागती पत्करत असल्याचे म्हटलेले नाही.

Title:इटलीने कोरोना व्हायरसपुढे शरणागती पत्करली का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
