
माध्यमांच्या देशभरात साधारण तापमानापेक्षा जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “हवामान विभागाने 29 मे ते 2 जून दरम्यान तापमान 45°C ते 55°C दरम्यान वाढण्याचे संकेत देत हाय अलर्ट सांगितले असून नागरिक सुरक्षा महासंचालनालय नागरिकांना सतर्कतेचा इशारा देला आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला मेसेज फेक आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “२९ मे ते २ जून दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणताही व्यक्ती बाहेर (मोकळ्या आकाशाखाली) जाणार नाही, कारण हवामान विभागाने तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिक सुरक्षा महासंचालनालयाने नागरिकांना रहिवाश्याना सतर्कतेचा इशारा दिला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हायरल मेसेजमध्ये कोणत्या राज्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे ? हे सांगितले नाही.
कीव्हर्ड सर्च केल्यावर हवामान विभागाने असा कोणताही इशारा दिल्याचे माध्यमांवर आढळत नाही.
भारतीय हवामान विभागच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील हाय अलर्टचा इशारा दिल्याची कोणतीही माहिती आढळत नाही.
मूळ पोस्ट – भारतीय हवामान विभाग
फॅक्ट क्रेसेंडोने भारतीय हवामान विभागाच्या कर्मचारी शुभांगी भूटे यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितले की, “व्हायरल होत असलेला मेसेज खोट असून भारतीय हवामान विभागाने असा कोणताही इशारा दिला नाही.”
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने नागरी संरक्षण संप्रेषण विभागाच्या फायर सर्व्हिसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होम गार्डस विभागाशी संपर्क साधल्यावर तेथील कर्मचारीने व्हायरल दाव्याचे खंडण करत सांगितले की, “व्हायरल मेसेज खोटा असून विभागाने असा कोणताही इशारा दिला नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा असून भारतीय हवामान विभाग आणि नागरिक सुरक्षा महासंचालनालयाने हाय अलर्टचा इशारा दिला नाही. खोट्या दाव्यासह मेसेज व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हवामान विभागाने हाय अलर्टचा इशारा दिला नाही; खोटा मेसेज व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
